नगर - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाची शपथ घेतली, त्यानंतर ज्या प्रश्नाकडे त्यांनी लक्ष वेधले त्यात ओबीसी आरक्षणाचा समावेश होता. या सरकारला ओबीसी आरक्षणाचे गांभिर्य समजले असून, तसं पावलं पडतील... ओबीसी आरक्षण मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या असल्याची प्रतिक्रिया ओबीसी, व्हीजे, एनटी जनमोर्चाचे अ.नगर शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी एका पत्रकाद्वारे व्यक्त केली.
ओबीसी आरक्षणाच्या त्रुटी रहित अहवाल सादर करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर दिल्याने हा प्रश्न सरकार सोडविण्याच्या दृष्टीने पावलं टाकत आहे, याची जाणिव झाली असून याबद्दल नव्या सरकारचे स्वागत करुन भुजबळ यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे. आपल्या सरकारकडून ओबीसी आरक्षणाचा हक्क अबाधित राहिलं, त्यासाठी सरकारचे प्रयत्न राहतील, अशी अपेक्षा असून, ओबीसी बारा बलतेदार वंचित समाजाला न्याय मिळावा, समाजात समानता आणण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेणे लोकशाहीच्या दृष्टीने महत्वाचा ठरणार आहे, असे श्री.भुजबळ यांनी पत्रकात म्हटले आहे.
------------
Post a Comment