अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर शहरांमधील क्लेरा ब्रुस हायस्कूल येथील जागा लँड माफिया व कबजा ठोक गॅंग कडून बळकावण्याचा प्रयत्न सुरू असून या लँड माफियांवर मोक्काअंतर्गत कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणी साठी ख्रिश्चन समाज व शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे मागणी केली. यावेळी मराठी मिशनचे डी.जी भांबळ, शिवसेनेचे दिलीप सातपुते, संभाजी कदम, माजी महापौर अभिषेक कळमकर, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड, नगरसेवक दत्ता कावरे, सचिन जाधव, जेम्स अल्हाट, विशाल केदारी, पास्टर प्रकाश बनसोडे, राजू देठे, अजय सूर्यवंशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
शहरातील क्लेरा ब्रुस हायस्कूल या संस्थेच्या मालकीच्या मालमत्तेत दि.२८ मे रोजी रात्री १२ ते २ वाजण्याच्या सुमारास शहरातील काही लँड माफिया व कब्जा ठोक गॅंग मराठी मिशन संचलित स्कूलच्या शाळेचे गेटच्या कंपाउंड चे कुलूप तोडून अनधिकृतपणे १०० ते १५० गुंड हातात शस्त्र व लाठी काठी घेऊन मारण्याच्या हेतूने आले होते.
Post a Comment