माझी वसुंधरा अभियान 2 मध्ये अहमदनगर महानगरपालिका राज्यात अव्वल

माझी वसुंधरा  अभियान 2 मध्ये  अहमदनगर  महानगरपालिका राज्यात  अव्वल 
अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि माझी वसुंधरा अभियान संचालनालय आयोजित  माझी वसुंधरा अभियान २ अंतर्गत भूमी,जल,वायू,अग्नी, आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची घेण्यात आलेल्या स्पर्धे अंतर्गत अमृत गटामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या अमृत शहरांमध्ये अहमदनगर महानगरपालिकेचा अव्वल कामगिरी केल्या बद्दल समावेश असून ५ जून २०२२ रोजी मा.मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली माझी वसुंधरा अभियानांतर्गत  घेण्यात आलेल्या स्पर्धेचा सन्मान सोहळा आयोजित केला असून
मा.महापौर सौ. रोहिनीताई संजय शेंडगे,मा.उपमहापौर श्री.गणेश भोसले,मा.आयुक्त श्री.शंकर गोरे मा.उपायुक्त श्री.यशवंत डांगे यांच्या सह माझी वसुंधरा अभियानात काम केलेले ४ पदाधिकारी/कर्मचारी यांनाही निमंत्रित केले आहे.या सोहळ्यास मा.उपमुख्यमंत्री,
मा.महसूल मंत्री, मा.नगरविकास मंत्री, मा.ग्रामविकास मंत्री, मा. मंत्री पाणी पुरवठा व स्वछता, मा.मंत्री पर्यावरण व वातावरणीय बदल, मा.राज्यमंत्री पर्यावरण व वातावरणीय बदल हे उपस्थित राहाणार आहेत. अशी माहिती उपायुक्त श्री.यशवंत डांगे यांनी दिली.
माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत अहमदनगर महानगरपालिकेने पर्यावरणाचे संवर्धन,संरक्षण व जतन करण्यासाठी
ऊर्जा बचत करणारे पथ दिवे,सौर ऊर्जा प्रकल्प,वृक्षगणना, पुरातन प्राचीन वृक्ष जतन, वॉटर हार्वेस्टिंग, पाणी लेखा परीक्षण,ऊर्जा लेखा परीक्षण,उद्यान निर्मिती,जलसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण , भिंतीचे  रंगकाम 
सुशोभीकरण , इलेक्ट्रिक वाहने प्रोत्साहन देणे,चार्जिंगची व्यवस्था करणे या योजनांवर प्रभावी काम केले असे उपायुक्त श्री.यशवंत डांगे यांनी सांगितले.
माझी वसुंधरा अभियाना साठी 
मा.खासदार श्री.सुजय विखे साहेब,मा.आमदार श्री. संग्राम भैय्या जगताप यांची सूचना व मार्गदर्शन लाभले.
माझी वसुंधरा अभियान यशस्वी करण्यासाठी नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभले त्यांचे  महापालिकेच्या वतीने आभार व्यक्त करून अभिनंदन करण्यात येत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post