पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेली कामे आजही लोकोपयोगी - शिवाजीराव कर्डिले

 

     नगर- पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची आज देवी म्हणून पूजा केली जाते, लोक त्यांना देवीचा अवतार मानतात. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अशी अनेक कामे भारतात केली, आजही लोकोपयोगी आहेत.  त्यांना भारतातील अनेक तीर्थक्षेत्रांवर बांधलेली मंदिरे मिळाली आणि तेथे जाण्यासाठी रस्ता बांधला, विहिरी व घाट बांधले. त्याचप्रमाणे अंधश्रद्धा निर्मुलनासाठी प्रयत्न करुन महिलांना सन्मान मिळवून दिला. त्यांचे विचार आणि कार्य आजही आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन माजी आ.शिवाजीराव कर्डिले यांनी केले.

     नगर तालुक्यातील धनगरवाडी येथे अहिल्यादेवी युवा प्रतिष्ठानच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी माजी आ.शिवाजीराव कर्डिले, हभप. बाळकृष्ण महाराज केंद्रे, बाजीराव गवारे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबसाहेब भाऊसाहेब शिकारे, उपाध्यक्ष सचिन वीरकर, बाळासोहब वाघ, विरेंद्र तोडमल, संपत शिकारे, आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी हभप गौरीताई सांगळे यांचे जाहीर किर्तन झाले. यावेळी प्राचार्य कोंडीराम भिटे, संपत शिकारे, मुख्याध्यापक सौ.शोभाताई जाधव यांचा सेवानिवृत्तीबद्दल तसचे राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल सौ.सुनिता लांडे यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

     याप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबासाहेब भाऊसाहेब शिकारे यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून प्रतिष्ठानच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

     कार्यक्रमाचे प्रास्तविक इंद्रभान वीरकर यांनी केले तर सूत्रसंचालन बापूराव तागड यांनी केले.  यावेळी कार्यक्रमास  किरण कातोरे, बाबासाहेब शिकारे, बापूराव तागड, सोमनाथ शिकारे, रमेश भोजने, महेश वीरकर, लहानू तागड, नवनाथ म्हस्के, सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व सदस्य ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.



     

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post