राज्यात लवकरच भाजपचे सरकार दिसेल - महेंद्र गंधे
नगर - महाविकास आघाडी सरकार ला जनतेच्या कामाचे त्यांना कसलेही देणे घेणे राहिलेले नाही. स्वत:चा विकास करण्यावरच त्यांचा भर राहिला आहे. त्यामुळे जनतेमध्ये त्यांची प्रतिमा मलिन झालेली आहे. त्यामुळे आमदारांचाही त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळेच विधानपरिषद निवडणुकीत भाजपाचे पाचही उमेदवार निवडून देत भाजपवर विश्वास दाखविला आहे. केंद्र सरकारच्या विविध विकास कामांमुळे भाजप अनेक ठिकाणी विजयी होत आहे. आता यापुढील लक्ष म्हणजे लवकरच राज्यात भाजपचे सरकार विराजमान झालेले दिसेल असा विश्वास भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी व्यक्त केला.
विधानपरिषद निवडणुकीमध्ये भाजपाचे उमेदवार प्रवीण दरेकर ,राम शिंदे ,श्रीकांत भारतीय ,उमा खापरे ,प्रसाद लाड हे विजयी झाल्यानंतर नगर शहर भाजपाच्यावतीने लक्ष्मीकारंजा येथील पक्ष कार्यालयात जल्लोष साजरा करण्यात आला. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, अॅड.अभय आगरकर, वसंत लोढा, ऍड विवेक नाईक , तुषार पोटे, महेश नामदे, , माजी महापौर बाबासाहेब वाकळे, किशोर डागवाले,मनिष साठे ,नगरसेवक रविंद्र बारस्कर, मनोज कोतकर ,अजय चितळे ,प्रदीप परदेशी ,ज्ञानेश्वर काळे, बाबासाहेब सानप ,गिता गिल्डा, सुरेखा विदये ,मालनताई ढोणे, अंजली वलकट्टी ,ज्योति दांगडे, प्रिया जानवे, रेखा मैड, अनिल सबलोक आदि उपस्थित होते.
याप्रसंगी संघटन सरचिटणीस ऍड विवेक नाईक भाजपने विरोधीपक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विधान परिषद निवडणुकीत विजय मिळविला आहे. केंद्र सरकारच्या विकास कामांवर जनता खूष असल्याने भाजप पक्षावर विश्वास वाढत आहे.
याप्रसंगी अॅड.अभय आगरकर, वसंत लोढा, बाबासाहेब वाकळे, किशोर डागवाले,मनेष साठे ,सुरेखा विदये यांनीही या विजयाचे मनोगतातून स्वागत केले तुषार पोटे यांनी आभार मानले. यावेळी ,
उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी ,संतोष गांधी ,वसंत राठोड ,जगन्नाथ निबांळकर ,बाळासाहेब गायकवाड ,बाळासाहेब भुजबळ ,प्रशांत मुथा ,सचिन पारखी ,किशोर कटोरे ,दत्ता गाडळकर ,अमोल निस्ताने ,बंटी ढापसे ,किशोर बोरा ,सुमित बटुळे ,मंगेश खंगले ,मिलिंद भालसिंग , धनंजय जामगांवकर संजय ढोणे, वैभव झोटिंग, , महावीर कांकरिया आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी फटाक्यांचे अतिषबाजी करुन , पेढे वाटण्यात आले. भारतीय जनता पार्टीचा विजय असो...च्या घोषणांनी परिसर दुमदुमन गेला होता.
-------
Post a Comment