नगर - शामाप्रसाद मुखर्जी हे भारताचे पहिले उद्योग आणि पुरवठा मंत्री आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक होते. त्यांनी त्या काळी काश्मिरसाठी लागू करण्यात आलेल्या कलम 370 ला विरोध केला. काश्मिर हा भारताचाच भाग आहे, त्यामुळे तेथे वेगळे कायदे का? असा प्रश्न उपस्थित करत मंत्रीपदाचा राजीनामा दिला. जनसंघाचे एक संस्थापक असलेल्या शामाप्रसाद मुखर्जी यांनी जनसंघाचे कार्य देशभर पोहचविण्याचे काम केले. आपल्या प्रभावी व्यक्तीमत्वाने व वकृत्वाने वेगळी प्रतिमा निर्माण केली. त्यांचे कार्य आजही आपणासाठी प्रेरणादायी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने त्यांच्या नावे सर्वसामान्यांसाठी कल्याणकारी योजना सुरु करुन कार्याचा उचित सन्मान केला, असे प्रतिपादन भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी केले.
नगर शहर भाजपाच्यावतीने जनसंघाचे संस्थापक शामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, संघटन सरचिटणीस अॅड.विवेक नाईक, सरचिटणीस तुषार पोटे, महेश नामदे, माजी उपमहापौर मालनताई ढोणे, ओबीसी शहर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, उपाध्यक्ष शिवाजी दहिंडे, संतोष गांधी, बाबासाहेब सानप, अनिल सबलोक, युवा मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष महेश तवले, सावेडी मंडल अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, केडगांव मंडल अध्यक्ष पंकज जहागिरदार, अनुसूचित मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटोळे, भटक्या विमुक्त जाती जमातीचे शहर जिल्हाध्यक्ष निशांत दातीर, दत्ता गाडळकर, मिलिंद भालसिंग, प्रविण ढोणे, सुमित बटूळे, सचिन पारखी, ज्ञानेश्वर धिरडे, अजय ढोणे, सागर शिंदे, सुनिल सकट, किशोर बोरा, अशोक भोसले, पोपट भोसले, आकाश सोनवणे,महावीर कांकरिया ,अनिल देवराव ,लक्ष्मीकांत तिवारी , बाळासाहेब भुजबळ आदि उपस्थित होते.
याप्रसंगी अॅड.विवेक नाईक यांनी शामाप्रसाद मुखर्जी यांच्या जीवन कार्याचा आढावा घेत, त्यांच्या विचारावर भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते काम करत असल्याचे सांगितले.
यावेळी सचिन पारखी, अनिल सबलोक, मालनताई ढोणे आदिंनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन तुषार पोटे यांनी केले तर आभार मिलिंद भालसिंग यांनी मानले. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
--------
Post a Comment