धनगर समाजातील नवउद्योजक महिलांसाठी मार्जिन मनी योजना


            अहमदनगर  (प्रतिनिधी)  केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यातील भटक्या जमाती 'क' प्रवर्गातील धनगर समाजातील सवलतीस पात्र नवउद्योजक महिलांना मार्जीन मनी उपलब्ध करून देणेबाबतची योजना समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेचा समाजकल्याण विभागाकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन समाजकल्याण सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी केले आहे.

            महाराष्ट्र राज्यातील भटक्या जमाती (क) प्रवर्गातील धनगर समाजातील सवलतीस पात्र १८ वर्षा वरील नवउद्योजक महिलांना १० टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टॅंड अप इंडिया योजनेअंतर्गत ७५% कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित फ्रंट एंड सबसिडी अनुषंगाने नवउद्योजकांना प्रकल्प मूल्याच्या १५% हिस्सा (अनुदान) राज्य शासनामार्फत देण्यात येईल.

            अहमदनगर जिल्हयातील पात्र इच्छूक भटक्या जमाती (क) प्रवर्गातील धनगर समाजातील नवउद्योजक महिलांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण, अहमदनगर अभिविश्व कॉम्प्लेक्स, बोल्हेगाव फाटा, नगर मनमाड रोड, अहमदनगर या कार्यालयाशी संपर्क साधावा व सदर योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहनही श्री.देवढे यांनी केले आहे.     

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post