उत्कर्ष फौंडेशनच्यावतीने धनगरवाडी येथे सर्वरोग निदान शिबिर संपन्न गरजू नागरिकांसाठी उत्कर्ष फाऊंडेशनचे कार्य कौतुकास्पद- उद्योजक बापूराव तागड


      नगर - कोरोना महामारीमुळे आज अनेकांवर आर्थिक संकट निर्माण झाले आहे, गरजू व गरजवंत नागरिकांना या समाजामध्ये सेवाभावी संस्थेच्या वतीने विविध प्रकारचे मदतकार्य सुरू आहे. उत्कर्ष फाउंडेशन च्या वतीने आज धनगरवाडी ग्रामस्थांसाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून मोफत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करून गरजवंत नागरिकांना एक मदतीचा हात देण्याचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन उद्योजक बापूराव तागड यांनी केले.
   
 उत्कर्ष फौंडेशन या सामाजिक संस्थेचे सचिव ज्ञानेश्वर भिसे व धनगरवाडीचे सरपंच किशोर शिकारे यांच्या वतीने धनगरवाडी येथे  सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन केले.  अ नगर येथील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टर राहुल पंडित यांच्या हस्ते द्रीप प्रज्वलन करून या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी  उद्योजक बापूराव तागड बोलत होते. 
यावेळी फाउंडेशनचे सदस्य राजेंद्र नजन, इंजिनीयर डी.आर. शेंडगे,आर्किटेक चंद्रकांत तागड आदी उपस्थित होते.
   यावेळी अस्थिरोग तज्ञ डॉ. राहुल पंडित यांनी शिबीरात अनेक ग्रामस्थांचे  तपासणी केली.फाउंडेशन तर्फे सध्या नगर शहर, उपनगरात, ग्रामीण भागात सेवा-भावणे  मोफत सर्व रोग निदान शिबिरे घेवून हजारो रुग्णांची तपासणी करून योग्य ते मार्गदर्शन मिळाल्याने मोफत शिबीरात चांगले काम होत असल्याचे सिद्ध केल्याचे त्यांनी सांगितले.
      कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अशोक भोजने यांनी संस्थेचे सामाजिक कार्याचा परिचय करून दिला. तसेच फाउंडेशन वतीने प्रत्येक वर्षी लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौक  येथे साजरी करण्यात येते. आजवर अहमदनगर जिल्ह्यातील  अनेक गावांमध्ये सर्वरोग निदान शिबीर भरविण्यात आले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये या शिबिरांचे आयोजन करण्याचा संस्थेचा मानस आहे आहे जेणेकरून गरजवंत नागरिकांना आरोग्य चांगले ठेवण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन मिळेल व आमच्या संस्थेच्या माध्यमातून एक मदतीचा हात मिळेल या उद्देशाने या शिबिराचे आयोजन धनगरवाडी येथे करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. 
     या यावेळी ज्ञानेश्वर भिसे यांनी शिबिरात आलेल्या ग्रामस्थांचे व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून शिबिरात  उपस्थित असलेल्या सर्व डॉक्टरांचा परिचय करून दिला.
       शिबिरात न्यूरोनप्लसचे अस्थिरोग तज्ञ डॉ.अविनाश गाडेकर, स्त्रीरोग तज्ञ डॉ. अमित कराडे, लहान मुलांचे डॉ. सचिन सोलट, दंतचिकित्सक डॉ. योगीराज विरकर, डॉ.सौ. विरकर आयुर्वेद तज्ञ डॉ. महेंद्र शिंदे तसेच त्यांची कन्या डॉ. सायली शिंदे, मानसोपचार तज्ञ डॉ.प्रसाद तागड, डॉ.परमेश्वर काळे यांनी या शिबिरात रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांना त्यांच्या शारीरिक तक्रारींचे निवारण करण्यासाठी विशेष मार्गदर्शन केले.
   धनगरवाडी गावाचे सरपंच किशोर शिकारे, ग्रामसदस्य अशोक वीरकर, उद्योजक बापूराव तागड, धोंडीराम शिकारे यांचे शिबिरास विशेष सहकार्य लाभले. ग्रामस्थांच्या वतीने सर्व डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला . फाऊंडेशनचे सचिव ज्ञानेश्वर भिसे यांनी सेवेची संधी दिल्याबद्दल ग्रामस्थांचे, सरपंच व इतर ग्राम सदस्यांचे आभार मानले.
---

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post