माजी मंत्री तथा भाजप कोअर कमिटी सदस्य नूतन विधान परिषद सदस्य प्रा.आ.राम शिंदे यांचा उद्या सत्कार सोहळा


     नगर - माजी पालकमंत्री तथा भाजप कोअर कमिटी सदस्य, प्रदेश उपाध्यक्ष नूतन विधानपरिषद सदस्य प्रा.आ.राम शिंदे यांचा पक्षाच्या वतीने जाहीर सत्कार तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक  संदर्भात नियोजन व मार्गदर्शन बैठक मंगळवार दि.28 जून 2022 रोजी आयोजित करण्यात  असल्याचे माहिती दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी दिली.

     यावेळी माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील,  माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले,  खा.सुजय  विखे पाटील, आ.मोनिकाताई राजळे, आ.बबनराव पाचपुते, आ.चंद्रशेखर कदम, माजी आ.स्नेहलताताई कोल्हे, माजी आ. बाळासाहेब मुरकुटे, माजी आ.वैभव पिचड आदि प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

     मंगळवार दि 28 रोजी संध्याकाळी 5 वा., माउली सभागृह , झोपडी कॅन्टीन शेजारी मनमाड रोड अहमदनगर येथे होत असलेल्या कार्यक्रमास प्रदेश पदाधिकारी, जिल्हा कार्यकारणी, मंडळ कार्यकारणी, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, जिल्हा व मंडळ आघाडी, मोर्चा, शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख व सर्व भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेते   उपस्थित रहणार असल्याचे उत्तर जिल्हाध्यक्ष  राजेंद्र गोंदकर यांनी सांगितले.

     तरी कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीच्या सर्व सदस्यांनी, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे असे आवाहन  शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र (भैय्या) गंधे यांनी केले.



     

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post