अक्षय तृतीयानिमित्त श्री विशाल गणेशाला आंब्यांचा नैवेद्य




     नगर - शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात अक्षय तृतीयानिमित्त श्री विशाल गणेशाला आंब्यांचा नैवेद्य दाखवून आंब्यांची सजावट करण्यात आली होती. सकाळी अभिषेक करण्यात आला. दुपारी उद्योजक मोहनशेठ मानधना परिवाराच्यावतीने पराग मानधना यांच्या हस्ते आरती करण्यात आली. पुजारी संगमनाथ महाराज, याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे, विश्वस्त पांडूरंग नन्नवरे, विजय कोथिंबीरे, प्रा.माणिक विधाते, संजय चाफे, गजानन ससाणे, ज्ञानेश्वर रासकर, प्रा.नितीन पुंड, चंद्रकांत फुलारी, बापूसाहेब एकाडे, भाऊसाहेब फुलसौंदर आदि विश्वस्त उपस्थित होते. याप्रसंगी अ‍ॅड.अभय आगरकर म्हणाले, ‘अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. याच दिवशी त्रेतायुगाला प्रारंभ झाला. या दिवशी  सत्ययुगाचा प्रारंभ झाली. अशी संधी साधलेली असल्यामुळे अक्षय तृतीया या संपूर्ण दिवसाला ‘मुहूर्त’ म्हणतात. या दिवसाला साडेतीन मुहूर्तांतील एक मुहूर्त मानले जाते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सातत्याने सुख-समृद्धी प्राप्त करून देणार्‍या देवतेची कृतज्ञतेचा भाव ठेवून उपासना केल्यास देवतेच्या कृपादृष्टी कायम आपल्यावर राहते. या काळात केलेले दानही सर्वात पवित्र मानले जाते, असे सांगून भाविकांच्या सोयी उपलब्ध करुन दिल्या असल्याचे सांगितले.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post