पद्मउद्योजक शॉपिंग महोत्सव मोठ्या प्रतिसादाने संपन्न
नगर - एक कामकरी कष्टकरी समाजातील महिलांच्या उदयोग व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या शॉपिंग महोत्सवाचे मला खरंच कौतुक वाटते, या 'पद्मउद्योजक शॉपिंग महोत्सवाची प्रेरणा घेऊन पुढच्या महिन्यातील अहमदनगर शहर स्थापना दिनाच्या औचित्याने सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन भव्य दिव्य असे पाच दिवसीय शॉपिंग फेस्टिव्हल आयोजित करून खऱ्या अर्थाने इथल्या उद्योजकांना, व्यावसायिकांना, महिलांना आणि लघु उद्योगांना प्रोत्साहन द्यायला हवे.....!" असे उदघाटनाच्या भाषणात अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ सुजय विखे पाटील म्हणाले.
श्री मार्कंडेय संकुलात पद्मशाली युवा शक्ती, पद्मशाली महिला शक्ती आणि पद्मनादम ढोल ताशा ध्वज पथक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'पद्मउद्योजक शॉपिंग महोत्सव 2022' च्या उदघाटन सोहळ्यात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर महानगरपालिकेच्या विद्यमान महापौर सौ रोहिणी संजय शेंडगे होत्या तर महिला बालकल्याण समितीच्या सभापती पुष्पाताई बोरुडे, नगरसेवक मनोज दुलम, निखिल वारे, माजी नगरसेवक धनंजय जाधव, विना बोज्जा, अर्चना बिज्जा, राधा गुरुड, मार्कंडेय देवस्थान कमिटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मंगलारम, सचिव कुमार आडेप, आय डी बी आय बँकेचे शाखाधिकारी आशिष शिंदे, लोकसत्ता संघर्षचे साळवे आणि व्यवस्थापिक श्रुती बत्तीनं बोज्जा, सी ए सुनंदा रच्चा, महिला शक्तीच्या माजी सुरेखा विद्ये, सुरेखा कोडम आणि समाज भूषण 2022 पुरस्काराच्या मानकरी तोफखाना पोलीस स्टेशनच्या निरीक्षक ज्योती गडकरी आणि क्रांती असंघटित कामगार संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा सौ अनिता कोंडा आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
"अहमदनगर शहरातील महिला शक्तीने आयोजित केलेला हा दोन दिवसीय भव्य दिव्य शॉपिंग महोत्सव म्हणजे रसिक आणि खवय्या नगरकरांसाठी एक मेजवानी आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या महोत्सवाला भेट देऊन त्याचा लाभ घ्यावा....!" असे आपल्या अध्यक्षीय मनोगतात महापौर रोहिणी शेंडगे म्हणाल्या. "शहराच्या मध्यवर्ती भागातील या कष्टकरी समाजाच्या या देखण्या संकुलाच्या विकासासाठी माननीय खासदार सुजयदादांनी निधी उपलब्ध करून देऊन, संकुलाचा रखडलेल्या विकासाचा राजमार्ग प्रशस्त करून घ्यावा" असे आवाहन आपल्या मनोगतात महिला व बालकल्याण सभापती सौ पुष्पाताई बोरुडे म्हणाल्या.
अहमदनगर शहरातील महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या शॉपिंग महोत्सवात पन्नास पेक्षा अधिक स्टॉल असून उदघाटक खासदार डॉ सुजय विखे पाटील आणि सर्व प्रमुख अतिथींना सर्व स्टॉलला भेट देऊन महिला उद्योजकांशी संवाद ही साधला. खरेदी केली व खास साऊथ इंडियन डिशेसचा मनसोक्त आस्वाद ही घेतला. नगरकरांनी शनिवार आणि रविवार अश्या दोन दिवस मोठ्या संख्येने या महोत्सवात खरेदीचा आणि खाद्य पदार्थांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन प्रास्ताविकात सौ सुरेखा विद्ये यांनी केले.
याच उदघाटन सोहळ्यात आपल्या सामाजिक आणि महिला विकासातील अलौकिक कार्याबद्दल तोफखाना पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी आणि क्रांती असंघटित कामगार संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा सौ अनिता कोंडा यांना मान्यवरांच्या हस्ते 'समाज भूषण पुरस्कार 2022' ने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता म्याना, मीनाक्षी कुरापाटी आणि स्वाती गाजेंगी यांनी केले तर सुरेखा कोडम यांनी आभार मानले. सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सारिका सिद्धम, उमा बडगू, लक्ष्मी म्याना, नीता बल्लाळ, स्वाती जंगम, रेणुका जिंदम, अनिता गुंडू आदींनी परिश्रम घेतले.
Post a Comment