अहमदनगर (प्रतिनिधी)- अखिल भारतीय बालरंगभूमी परिषद अहमदनगर शाखेच्या वतीने आयोजित हसत खेळत बालनाट्य शिबिराचे उदघाटन नाट्य परिषदेचे अध्यक्ष .अमोल खोले,जेष्ठ नाट्यकर्मी माध्यवर्तीचे सहकार्यवाह .सतीश लोटके,चित्रपट महामंडळाचे जिल्हा समन्वयक .शशिकांत नजान,प्रसिद्ध नाट्य लेखक,दिग्दर्शक .संदीप दंडवते, बालरंगभूमी परिषद जिल्हा शाखा अध्यक्षा सौ.उर्मिला लोटके,चित्रपट निर्माते .डॉ.रणजित सत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत नटराज पूजन करून शिबिरास प्रारंभ झाला यावेळी प्रसाद भणगे,देविप्रसाद सोहोनी,टीना इंगळे,सुजाता पायमोडे ,सागर अलचेट्टी हजर होते ..शिबीरात ७० विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
यावेळी बोलताना अमोल खोले म्हणाले की कलेला प्रशिक्षण मिळाले की तंत्रशुद्ध कलाकृती निर्माण होण्यास मदत होते.
बालकलाकारांनी मन लावून शिकावे.
.शशिकांत नजान म्हणाले की बालकांची आवड पाहून पालकांनी त्यांना संधी उपलब्ध करून द्यावी त्यांच्यावर बंधने लादू नयेत हसत-खेळत शिबीर म्हणून महत्वाचे आहे.
.संदीप दंडवते म्हणाले की बालरंगभूमी ही सर्वात अवघड आणि आव्हानात्मक रंगभूमी आहे.बालकांचा पाया पक्का होणे महत्त्वाचे असून प्रशिक्षणातून त्यांना धीट होण्याचे कार्य होते.सतत सराव करावा यातून व्यक्तिमत्व आकार घेते असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन प्रसाद भणगे यांनी केले तर आभार सुजाता पायमोडे यांनी मानले.
दहा दिवसात शिबिरात .सतीश लोटके,नाट्य सिने अभिनेते .मोहिनीराज गटणे,सिने नाट्य अभिनेत्री श्वेता मांडे व इतर तज्ञ मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.अशी माहिती बालरंगभूमी परिषद अध्यक्षा सौ.उर्मिला लोटके यांनी दिली.
Post a Comment