राष्ट्रवादीच्या दबावामुळे सावित्रीबाई फुले नगर या नावाचा फलक शिवसेनेच्या संभाजी कदम यांनी आज पर्यंत लावला नाही:नितीन भुतारे


 
 राष्ट्रवादीच्या दबावामुळे सावित्रीबाई फुले नगर या नावाचा फलक शिवसेनेच्या संभाजी कदम यांनी आज पर्यंत लावला नाही. नितीन भुतारे
अहमदनगर(प्रतिनिधी) अहमदनगर शहर शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम यांनी काल मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या वर टीका केली त्याला मनसेचे नितीन भुतारे यांनी रोकठोक पणे उत्तर दिले महापुरुषांचा अवमान करण्याची सवय हि शिवसेनेला आहे राष्ट्रवादी प्रमाणे जातीपातीचे राजकारण करण्याची पद्धत हि शिवसेनेने जोपासली आहे २७ डिसेंबर २०१७ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठपुरावा करताना  सारस नगर भागाला सावित्रीबाई फुले नगर असे नामकरण करा या साठी आंदोलनं केले होते त्यांनतर हा विषय महानगर पालिका महासभेत ३० डिसेंबर २०१७ रोजी मंजुर झाला हा विषय मंजुर होऊन देखील आजपर्यंत शिवसेना महानगरपालिकेत सत्तेत असताना देखील त्या भागाला आई सावित्री बाई फुले नगर नावाचा फलक लावण्यात आला नाहि विषेश म्हणजे त्यावेळी शहराच्या महापौर संभाजी कदम यांच्या सौभाग्यवती सुरेखा कदम होत्या महासभेत ठराव मंजूर होऊन देखील त्यावेळी शिवसेनेने हा नाम फलक लावला नाही   सर्वसामान्य जनतेच्या माध्यमातुन जी चर्चा होती ती की राष्ट्रवादीच्या दबावामुळे सावित्रीबाई फुले नगर या नावाचा फलक त्यावेळी शिवसेनेने लावला नाही.  आणि आजही शिवसेना सत्तेत असून महापौर शिवसेनेचा असून हा नाम फलक लावला जात नाही आजचे सत्ताधारी महापौर सुध्दा शिवसेनेच्या शहर अध्यक्ष यांच्या इशाऱ्यावर काम करतात सगळ्या शहरात विविध भागांत अनेक ठिकाणीं नामकरणाचे फलक लावण्यात आले मग ५वर्ष ते ६वर्ष होऊन देखील  आई सावित्री बाई फुले नगर नावाचा फलक का शिवसेनेकडून लावला जात नाहि. हा सावित्री बाई फुले यांचा अवमान नाहि का याचे उत्तर शिवसेनेनं शहारातील फुले प्रेमींना देणे गरजेचे आहे. राष्ट्रवादीचा सा हा प्रभाग असल्यामुळें जातीपातीच्या राजकारणामुळे सावित्री बाई फुले नगर नावाचा फलक लावण्याला विरोध होत आहे. अशी चर्चा नगर शहारत आहे आणि त्यांच्या दबावामुळेच सत्ताधारी शिवसेना  हे काम करत नाहि असा आरोप मनसेचे नितीन भुतारे यांनी शिवसेनेच्या संभाजी कदम यांच्यावर केला आहे येत्या दोन दिवसांत मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांच्या व शहराध्यक्ष गजेंद्र रशिनकर यांच्या नेतृत्त्वाखाली मनसेचे शिष्टमंडळ सावित्रीबाई फुले नगर नावाचा फलक लवकरात लवकर लावण्यात यावा याकरिता शिवसेनेच्या महापौर तसेच पालिका आयुक्त, उपमहापौर, महिला बालकल्याण समितीच्या सभापती, उपसभापती यांची भेट घेऊन मागणी करणार आहे
राजसाहेब ठाकरे हे सच्चे शिवप्रेमी आहेत संभाजी नगर दौऱ्यावेळी राजसाहेब ठाकरे यांनी पुण्यातील वडू येथिल संभाजी महाराज समाधी स्थळावर डोके टेकवून सुरवात केली व संभाजी नगर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले अभिवादन केले. हि आठवण मनसेचे नितीन भुतारे यांनी शहरप्रमुख संभाजी कदम यांना करुण दिली

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post