रेठरेहरणाक्ष नुतन चेअरमन शंकरराव शिंदे यांचा सत्कार संपन्न

वाळवा (वार्ताहर) रेठरे हरणाक्ष, ता. वाळवा येथील रेठरे हरणाक्ष विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मर्यादित रेठरेहरणाक्ष  या सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी श्री. शंकरराव ज्ञानदेव शिंदे (आप्पा)  यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल ओझर्डे - घबकवाडी चे सामाजिक कार्यकर्ते श्री. बजरंग कदम यांच्या शुभहस्ते शाल, फेटा, श्रीफळ व बुके देवून यथोचित सत्कार करण्यात आला. 

यावेळी लक्ष्मी दूध संस्थेचे संस्थापक व अमृत दूध संस्थेचे सचिव श्री. बाजीराव शिंदे,  पैलवान श्री. शिवाजीराव गोंदिल, पाणीपुरवठा चे चेअरमन श्री. संपतराव शिंदे, श्री. प्रल्हाद शिंदे (बापू), श्री. मधुकरराव शिंदे, तसेच बहादूरवाडी चे प्रा. शिवाजीराव देसावळे, वाठारचे श्री. सुनिल चौगले, घबकवाडीचे अर्जुन कदम, गोविंद घबक, मरळनाथपूरचे श्री. सयाजीराव खोत, युवक नेते श्री.अमित माणीकराव घबक, राजाभाऊ घबक, सुरेश घबक, बाबासाहेब घबक, जालिंदर कदम यांचा सह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक बजरंग कदम यांनी केले. सत्कार कार्यक्रमाचे संयोजन गणेश घबक, हंबीरराव घबक, सौरभ कदम, कृष्णात खोत यांनी केले. शेवटी आभार प्रकाश कदम यांनी मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post