अत्याचारासह ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हे दाखल
अहमदनगर (प्रतिनिधी)गोवा येथून मोबाईल लोकेशनवरुन ताब्यात घेतलेला अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणातील आरोपी अलीम राजू शेख याला काल नेवासा न्यायालयात हजर केले असता 27 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. दरम्यान त्याच्यावर नेवासा पोलीस ठाण्यात अत्याचारासह ‘पोक्सो’ कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल झाला आहे.
6 मे रोजी अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन अंतरवाली येथील अलिम राजू शेख (वय 22) हा तिला गोवा येथे घेवून गेला होता. याबाबत तपास करताना पोलिसांना त्याचा मोबाईल क्रमांक मिळाला. या क्रमांकावरुन त्याचे लोकेशन निश्चित करुन गोवा पोलिसांच्या मदतीने त्याला मुलीसह गोव्यातून ताब्यात घेवून नेवासा पोलीस ठाण्यात आणले होते.
दरम्यान आरोपीवर रात्री उशिरा भारतीय दंड विधान कलम 376 नुसार अत्याचाराचा (बलात्कार) व ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला काल गुरुवारी नेवासा न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 27 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. याबाबत पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात करत आहेत.
Post a Comment