नगर - विळद घाट येथील डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात युवा महोत्सव रिद्म 2022 पार पडला. यावेळी फौंडेशनचे उपसंचालक प्रा.सुनिल कल्हापुरे, प्राचार्य डॉ.उदय नाईक व मान्यवर उपस्थित होते.
पाच दिवसींय युवा महोत्सवात ग्रुप डे, ट्रॅडिशनल डे, मिसमॅच डे, चॉकलेट डे, सारी डे, रोज डे आणि वॉलिवूड डे याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी लावणी, गाणी, कविता बरोबरच नाट्यकला, रॅम्प वॉक माध्यमातून सांस्कृतिक कलेचे दर्शन घडविले. फोटोग्राफी, रांगोळी, चित्रकला, थ्रीडी प्रिटींग, शेरोशायरी बरोबरच क्रीडा महोत्सव पार पडला.
विद्यार्थ्यांच्या कला-गुणांचा हा युवा महोत्सव वाव देणारा ठरला सर्वच विभागातील मुला-मुलींनी रिद्म मधून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यामध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह, बक्षिसे देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या आयोजन व नियोजनासाठी प्रा.सुनिल मांढरे, प्रा.निळकंठ देशपांडे, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. यासाठी फौंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी खा.डॉ.सुजय विखे पाटील, डायरेक्टर (टेक्नी.) डॉ.पी.एम. गायकवाड यांनी कौतुक केले.
-----------
Post a Comment