नगर - गेल्या अनेक दिवसांपासून बहुप्रतिक्षेत असलेला धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावरील ‘धर्मवीर मु.पो.ठाणे’ हा चित्रपट संपूर्ण राज्यात शुक्रवार दि.13 रोजी प्रसारित होत आहे. आपल्या नगर शहरामध्ये सुद्धा शिवसैनिक व नागरिकांसाठी याच दिवशी सकाळी 11.30 वा. मोफत प्रिमियर शो चे आशा स्क्वेअर चित्रपटगृहात आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम यांनी दिली.
यावेळी महापौर रोहिणी शेंडगे, जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे, युवा सेना जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड, महिला बाल कल्याण समितीच्या सभापती पुष्पा बोरुडे, सभागृहनेते अशोक बडे, माजी विरोधीपक्ष नेते संजय शेंडगे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, दिलीप सातपुते, सुरेखा कदम, शिलाताई शिंदे, अभिषेक कळमकर, ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे, गणेश कवडे, बाळासाहेब बोराटे, दत्ता कावरे, मंगल लोखंडे, सुवर्णा गेनप्पा, सुवर्णा जाधव, दत्ता सप्रे, मदन आढाव, अमोल येवले, संग्राम कोतकर, विजय पठारे, बबलु शिंदे, सचिन शिंदे, शाम नळकांडे, अनिल बोरुडे, योगीराज गाडे, संग्राम शेळके, दिपक खैरे, प्रशांत गायकवाड, रावसाहेब खेवरे, राजेंद्र दळवी, गिरिष जाधव, संदेश कार्ले, शरद झोडगे, राजेंद्र भगत, सुनिल लालबोंद्रे, रवि लालबोंद्रे, प्रकाश फुलारी, अरुणा गोयल, कांता बोठे, हर्षवर्धन कोतकर, रवि वाकळे, आकाश कातोरे, रिता भाकरे, अंबादास शिंदे, पारुनाथ ढोकळे, महिला आघाडीच्या स्मिता अष्टेकर, आशा निंबाळकर, आदिंसह सर्व महिला आघाडी, युवा सेना, शिक्षक आघाडी, कामकार आघाडी, माथाडी सेना, वाहतुक सेना आदिंसह सर्व पदाधिकारी, शिवसैनिक, शिवप्रेमी, नागरिकांनी या प्रिमिअर शो साठी उपस्थित राहणार आहेत
Post a Comment