नगर (प्रतिनिधी) पिंप्री लौकी अजमपूर येथील रहिवाशी व प्रभाकरराव भोर विद्यालय,आंबी खालसा येथील शिक्षक अशोकराव गिते व सौ सविता अशोक गिते यांची सुकन्या कु.संस्कृती हिची कॅनडा येथील ओंटारिओ विद्यापीठाअंतर्गत फॅ नशेव कॉलेज येथे एम.एस. साठी निवड झाली आहे.
कु.संस्कृती गिते हिचे प्राथ. व माध्य शिक्षण सह्याद्री विद्यालय संगमनेर येथे तर पुणे विद्यापीठातून बी. टेक. इंजिनिरिंगची पदवी उच्च श्रेणीमधून संपादन केली. पदव्युत्तर शिक्षणासाठी ती कॅ नडा येथे रवाना झाली.
या निवडीबद्दल तिचे समस्त पिंप्रीकर नागरिकांच्यावतीने तसेच माजी जि. प.अध्यक्षा सौ शालिनीताई विखे, माजी.विरोधी पक्षनेते आ.राधाकृष्ण विखे पा., नगर द.चे खासदार .सुजयदादा विखे पा. आदिंनी अभिनंदन केले आहे
Post a Comment