नगर - भारतीय संविधाने शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील गरीब, वंचित, दुर्बल, उपेक्षित बांधवांना समानतेचा हक्क आणि स्वाभिमानासाठी लढण्याचे बळ दिले. शिका आणि संघटीत व्हा या त्यांच्या संदेशाने बहुजनांच्या कित्येक पिढ्यांचे कल्याण केले. त्यांचे प्रत्येक क्षेत्रातील असामान्य कार्य आपणास नेहमीच प्रेरणादायी राहील. आपणही समाजात काम करतांना त्यांचे विचार आत्मसात करुन त्याप्रमाणे कार्य केल्यास समाजातील दु:ख दुर होण्यास मदत होईल. शिवसैनिकांनी नेहमीच राष्ट्रपुरुषांच्या कार्याचा पुरस्कार करुन त्यांच्या विचारावर काम करत असल्याचे प्रतिपादन शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम यांनी केले.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्यावतीने त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महापौर रोहिणी शेंडगे, शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, माजी विरोधीपक्ष नेते संजय शेंडगे, दिलीप सातपुते, भगवान फुलसौंदर, गणेश कवडे, दत्ता कावरे, सचिन शिंदे, प्रशांत गायकवाड, दत्ता जाधव, संतोष गेनप्पा, दिपक खैरे, संग्राम कोतकर, बबलू शिंदे, अरुणा गोयल, प्रा.श्रीकांत बेडेकर, राजू देठे आदि उपस्थित होते
याप्रसंगी महापौर रोहिणी शेंडगे म्हणाल्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दुर्लक्षित घटकांसाठी काम करुन त्यांच्यातील निराशा दूर केली आणि त्यांना समानतेचा अधिकार मिळवून दिला. डॉ.आंबेडकर यांनी नेहमीच जातीभेद संपवण्यासाठी संघर्ष केला. आपणही त्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी काम केले पाहिजे, असे आवाहन केले.
यावेळी दिलीप सातपुते, भगवान फुलसौंदर आदिंनीही आपल्या मनोगतातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. शेवटी गणेश कवडे यांनी आभार मानले.
Post a Comment