नगर - डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जगातील सर्वोत्तम अशी राज्यघटना दिली आहे. या राज्य घटनेच्या माध्यमातूनच आपण प्रजासत्ताक आणि बलशाली राष्ट्र म्हणून वाटचाल करत आहोत. तसेच विविधतेने नटलेल्या आपल्या देशाला राज्य घटनेच्या एका सुत्रात गुंफून एकसंघ ठेवण्याची किमया डॉ.बाबासाहेबांनी केली आहे. डॉ.बाबासाहेबांचे विचार जगभर पोहचविण्यासाठी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन येथील वास्तव असलेली वास्तू ऐतिहासिक ठेवा म्हणून संरक्षित केली आहे. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे विविध योजना राबवून त्यांचा लाभ संबंधितांना मिळवून देत आहेत, असे प्रतिपादन भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी केले.
भाजपाच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मार्केट यार्ड येथील पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी नगर प्रभारी मनोज पांगारकर, भाजप शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, संघटन सरचिटणीस अॅड.विवेक नाईक, सरचिटणीस तुषार पोटे, मनेष साठे, प्रदीप परदेशी, अनंत जोशी, बंटी ढापसे, व्यंकटेश बोमादंडी, सुमित बटूळे, जालिंदर शिंदे, दिपक उमाप, ज्ञानेश्वर धिरडे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी मनोज पांगरकर यांनी मनोगतातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजा तळागाळातील व्यक्तींचा प्रामुख्याने विचार केला. शिक्षणासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष केला. असे सांगून त्यांच्या कार्याचा आढावा घेतला.
याप्रसंगी मनेष साठे, विवेक नाईक आदिंनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग सांगून त्यांच्या कार्याचा गौरव केला. शेवटी तुषार पोटे यांनी आभार मानले.
Post a Comment