योजनांचा लाभ मिळण्यासाठी आधार कार्ड हे महत्वाचे
-वसंत राठोड
नगर - आज प्रत्येक सरकारी असो वा खाजगी ठिकाणी आधार कार्ड हे महत्वाचे झाले आहे. अनेक नागरिकांचे आधार कार्ड आहेत, परंतु आता त्यात काळानुरुप बदल करावे लागतात. यासाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत, ही गैरसोय टाळण्यासाठी भाजपाच्यावतीने राबविण्यात आलेला उपक्रम नागरिकांसाठी मोठी दिलासादायक असाच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने सर्वसामान्यांसाठी विविध लाभदायी योजना राबविल्या आहेत, या योजनांचा लाभ मिळण्यासाठी आधार कार्ड हे महत्वाचे आहे. भाजपाच्या कार्यकर्ते विविध योजना लाभर्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम करत असल्याचे भाजपा भिंगार शहरध्यक्ष वसंत राठोड यांनी केले.
भारतीय जनता पार्टी स्थापना दिनानिमित्त अहमदनगर पोस्टल विभाग व अंत्योदय प्रतिष्ठान, भाजप व भाजपा युवा मोर्चा भिंगार शहरच्यावतीने आधार कार्ड शिबीराचे आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी भाजपाचे नगर शहर जिल्हाध्यक्ष भंया गंधे ,भिंगार अध्यक्ष वसंत राठोड, युवा मोर्चाचे अध्यक्ष किशोर कटारे, उपाध्यक्ष संतोष हजारे, विलास गव्हाणे, आनंद बोथरा, अनंत रासने, सुरेश तनपुरे, सौ.वैशाली कटोरे, कमलेश धर्माधिकारी, अजय देवकुळे, चौधरी, देव, आदि उपस्थित होते.
यावेळी किशोर कटोरे म्हणाले, या योजनेत मोफत बाल आधार कार्ड, आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करणे, नवीन आधार कार्ड काढणे, आधार कार्डमध्ये दुरूस्त करणे , पोस्टल बँक खाते उघडणे, सुकन्या समृध्दी योजनेची माहिती देण्यात आली आहे, या उपक्रमास भिंगार शहरातील नागरिकांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अशाच उपक्रम यापुढेही राबविण्यात येतील, असे सांगितले.
याकामी अ.नगर पोस्ट ऑफिस व भिंगार शहरातील सर्व अंगणवाडी सेविकांनी विशेष सहकार्य दिल्याबद्दल शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Post a Comment