गुलमोहोर रोडवरील स्माईल एक्सएल अहमदनगर शाखेचे उद्घाटन संपन्नचेहर्‍यावरील एक स्माईल समोरच्या व्यक्तीसाठी सकारात्मक ठरते- अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

नगर :-   ( विजय मते)   सध्या प्रत्येकजण ताण-तणावाने व्यापलेला आहे. आपल्या चेहर्‍यावरील एक स्माईल समोरच्या व्यक्तीसाठी सकारात्मक ठरत असते. हीच सकारात्मकता आपले व्यक्तीमत्व खुलवते. चेहर्‍यावरील प्रसन्नता ही आपल्या एका हास्यांवर अवलंबून आहे, त्यासाठी आपले दात निरोगी, स्वच्छ, सुंदर असणे गरजचे आहे. स्माईल एक्सएलने दंतवैद्यकीय क्षेत्रात आपल्या सेवेने वेगळे स्थान निर्माण केले आहे, त्यांच्या शाखांचा होत असलेला विस्तार हे त्याच्या उत्कृष्ट सेवेची पावती आहे. पुणे-मुंबईसारखीच आधुनिक तंत्रज्ञानयुक्त सेवा आता नगरमध्येही उपलब्ध झाल्याने नगरकरांची मोठी सोय झाली असल्याचे प्रतिपादन उद्घाटनप्रसंगी सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी केले.
सावेडी, गुलमोहोर रोडवरील पारीजात चौकातील स्माईल एक्सएल अहमदनगर शाखेचे उद्घाटन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी स्माईल एक्सएलचे संचालक डॉ.सुजित परदेशी, सौ.रिना परदेशी, अहमदनगर शाखेचे प्रमुख डॉ.ओंकार कुलकर्णी, सौ.प्रणिता कुलकर्णी, सहाय्यक दंतचिकित्सक डॉ.माधुरी दुशिंग, कोथरुड शाखेचे डॉ.रोहन नाखोले, सिंहगड रोड शाखेचे डॉ.गणेश कुलकर्णी, राहुरी शाखेचे डॉ.महेश गव्हाणे हे ही उपस्थित होते.
प्रास्तविकात डॉ.सुजित परदेशी म्हणाले, दंतवैद्यकीय क्षेत्रात दिवसेंदिवस अनेक बदल होत आहे, या बदलांचा स्विकार करुन जागतिक दर्जाची दंत चिकित्सा स्माईल एक्सएलच्या माध्यमातून माफक दरात रुग्णांना देण्यात येत आहे. अत्याधुनिक मशिनरी व तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली विविध शाखांमधून दंत वैद्यक क्षेत्रात आघाडी घेतली आहे. आता या शाखेच्या माध्यमातूनही नगरकरांना या सेवेचा अनुभव मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
डॉ. ओंकार कुलकर्णी म्हणाले, गेल्या 22 वर्षांपासून दंत वैद्यक क्षेत्रात काम करत असतांना आधुनिक उपचार पद्धतीचा स्विकार करुन रुग्णांना सेवा दिली. आता स्माईल एक्सएल सारख्या श्रृंखलेमध्ये नगरचाही समावेश करुन या सेवेला आणखी व्यापक करण्याचा प्रयत्न केला आहे. दातांच्या विविध आजारांवर उपचार या ठिकाणी होणार असल्याचे सांगितले.
या उद्घाटन सोहळ्यास नगरसेवक भैय्या गंधे, निखिल वारे, संभाजी कदम आदिंसह उद्योजक, व्यापारी, शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 
याप्रसंगी डॉ.किशोर पांडव, डॉ.गायत्री पांडव, डॉ.जयंत लंके, डॉ.कल्याणी लंके, निवृत्त प्राचार्य के.डी.कुलकर्णी, सौ.उर्मिला कुलकर्णी, सौ.नेहा नाखोले, डॉ.भाग्यश्री कुलकर्णी, डॉ.अश्लेषा गव्हाणे, आर्कि.संदेश धाडिवाल, ग्राफिक्स डिझायनर कल्पेश भावसार, संगणक अभियंता समिर हिंगवे, विक्रम हिंगवे, डॉक्टर्स, स्टाफ, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांचे प्रणिता कुलकर्णी यांनी आभार मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post