आयुष्मान भारत योजनेतून 3 कोटींपेक्षा अधिक लोकांवर उपचार : योजना अधिक व्यापक स्वरुपात राबविणार - भैय्या गंधे



     नगर - मोदी सरकारने गोरगरीब, वंचितांसाठी सुरु केलेल्या आयुष्मान भारत योजनेतून आजवर देशभरात 3. 28 कोटींपेक्षा अधिक लोकांवर उपचार करण्यात आले आहेत. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी 18 कोटींपेक्षा अधिक लोकांना आयुष्मान कार्डचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये राज्यासह नगरमधील अनेक नागरिकांचा समावेश आहे. या योजनेचा नगरमधील अनेक रुग्णांनी लाभ मिळाल्याने त्यांची वेळ आणि पैशांचीही बचत झाली आहे. लाभार्थींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवादही दिले. या योजनेची नगरमध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते परिश्रम घेत असल्यचे  भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी सांगितले.

     स्वस्त दरात औषधे पुरविण्याच्या उद्देशाने देशभरात 8 हजार 694 पंतप्रधान जनऔषधी केंद्रे सुरु करण्यात  आले आहेत. गोरगरीब, वंचित वर्गातील जनतेला अनेक आजारांवरील महागडे उपचार परवडत नाहीत हे ओळखून मोदी सरकारने 2018 मध्ये आयुष्मान भारत योजनेचा प्रारंभ केला. या योजनेत खासगी आणि सरकारी रुग्णालयांत 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत केले जातात. या योजनेत सरकारी आणि खासगी मिळून 27 हजार 300 रुग्णालये सहभागी झाली आहेत. आयुष्मानभारत डिजिटल मिशनसाठी मोदी सरकारने सोळाशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

     या योजनेत देशभरातील 10. 74 कोटींपेक्षा अधिक गोरगरीब, वंचित कुटुंबांना म्हणजे 50 कोटी लोकांना मोफत उपचाराची सुविधा देणे हा या योजनेचा हेतू आहे. या योजनेची माहिती मिळवण्यासाठी mera.pmjay.gov.in  संकेतस्थळ सुरु करण्यात आले आहे. तसेच 14,555 आणि 1800-111-565 टोल फ्री क्रमांकांवरही या योजनेची माहिती मिळू शकेल. या योजनेचा लाभ घेतलेल्यांमध्ये सुमारे 47 टक्के महिला आहेत.

     देशातील आरोग्य सेवा आणि सुविधा परिपूर्ण बनविण्यासाठी मोदी सरकारने ‘आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन’ सुरु केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून 65 हजार कोटी रुपये खर्चून देशभरातील आरोग्य केंद्रात अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. जिल्हापातळीवरील सरकारी रुग्णालयात आयसीयु, व्हेंटीलेटर, ऑक्सिजन या सुविधांसह 37 हजार बेड उपलब्ध केले जाणार आहेत. या बरोबरच ब्लॉक पातळीवर 4 हजारपेक्षा अधिक सार्वजनिक आरोग्य केंद्रे तसेच प्रयोगशाळा सुरु केल्या जाणार आहेत. मोदी सरकारने सिरींज, डिजिटल थर्मामीटर, स्टेंट, डायलिसिस मशीन या सारख्या उपकरणांना औषधांच्या श्रेणीत आणल्यामुळे या उपकरणांच्या किंमती नियंत्रणात आल्या आहेत. मोदी सरकारने कॅन्सर, टीबी, मधुमेह यासारख्यादुर्धर आजारावरील 800 औषधे कमी किमतीत उपलब्ध करून दिली आहेत. स्वस्त दरात औषधे उपलब्ध करून देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रांची संख्या 9 मार्च 2022 पर्यंत 8 हजार 694 पर्यंत पोहचली आहे, असेही श्री.गंधे यांनी सांगितले.

---------

      

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post