शिक्षित व सुदृढ बालके ही देशाचे भवितव्य-भैय्या गंधे
नगर - शिक्षित आणि सुदृढ बालके ही देशाचे भवितव्य आहे, त्यामुळे त्यांच्या शिक्षण आणि आरोग्याबाबत सर्वांनीच जागृत राहिले पाहिजे. आरोग्य चांगले राहिल्यास विद्यार्थीही विविध क्षेत्रात प्रगती करु शकतात. बालकांना त्यांचे हक्क मिळावे, त्यांना शैक्षणिक सुविधा मिळाव्यात यासाठी केंद्र सरकारच्यावतीने विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. या योजनांचा लाभ घेत विद्यार्थीही आपली प्रगती साधत आहेत. आज जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून रविंद्र बारस्कर यांच्यावतीने विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीचा शिबीराचा राबविलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी केले.
भाजपाचे नगरसेवक रविंद्र बारस्कर यांच्यावतीने जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून सावेडी येथील महात्मा फुले शाळेतील विद्यार्थ्यांची सर्वरोग निदान तपासणी शिबीर घेण्यात आले. याप्रसंगी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, संघटन सरचिटणीस अॅड.विवेक नाईक, उदय कराळे, मिलिंद भालसिंग, चंद्रकांत पाटोळे, छाया रजपुत, डॉ.मनोहर देशपांडे, डॉ.शिल्पा चेलवा, मनोरमा थोरात, अजय बारस्कर, निलोफर पठाण, अजय बारस्कर, बाळासाहेब बारस्कर, भैय्या बारस्कर, बाबासाहेब भिंगारदिवे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी माजी महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले, मनपाच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्यबाबत नेहमीच जागृत राहून विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. कोरोना काळातही चांगली सेवा देत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली आहे. आज रविंद्र बारस्कर यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी उपक्रमामुळे विद्यार्थी सुदृढ राहण्यास मदत होईल, असे सांगितले.
यावेळी रविंद्र बारस्कर म्हणाले, नगरसेवक म्हणून प्रभागातील नागरिकांना मुलभुत सुविधा पुरविण्याबरोबरच प्रभागाच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करुन त्यांचे आरोग्य सुदृढ कसे राहण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले आहे, असेच उपक्रम यापुढेही राबविण्यात येतील, असे सांगितले.
याप्रसंगी अॅड.विवेक नाईक, उदय कराळे आदिंनी मनोगते व्यक्त केली. निलोफर पठाण यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी जयश्री म्हसे, हिराबाई गुंड, अश्विनी लोखंडे, विशाल जगताप, दिलीप दुधाडे, ज्योती टाळके, संगीता अकोलकर, प्रियंका पुंडे, अभय ठाणगे, अवधुत बारस्कर, अभिजित बारस्कर, जयदिप बारस्कर, समर्थ गोसावी, कृष्णा गडाख, प्रतिक कोळपकर आदि उपस्थित होते.
Post a Comment