अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्ह्यातील बालकलाकार नाट्य अभिनय क्षेत्रात अधिक प्रगल्भ व्हावेत या साठी महत्वाचे पाऊल म्हणजे बालरंगभूमी सशक्त करणे या अंतर्गत
बालरंगभूमी परिषद अहमदनगर जिल्हा शाखेच्या वतीने १में ते १० में २०२२ दरम्यान 'हसत खेळत बालनाट्य 'शिबिराचे (Acting workshop)आयोजन करण्यात आले अशी माहिती अध्यक्षा सौ.उर्मिला लोटके यांनी दिली आहे.त्या म्हणाल्या की नाट्य,गायन,वेबसिरीज,चित्रपट क्षेत्रात अहमदनगरचे कलाकार तंत्रज्ञ अग्रेसर आहेत.बालरंगभूमी हा कलाकारांचा पाया आहे आणि तोच मजबूत व्हावा बालकलाकरांना शास्त्रोक्त माहिती आणि प्रशिक्षण मिळावे ज्यातून त्यांचा चौफेर विकास व्हावा हा आमचा हेतू आहे. हसत खेळत शिबिरात नाट्य,अभिनय,नृत्य ,नवरस, रंगमंचीय खेळ याची ओळख अनुभवी नाट्य तज्ञांकडून मुलांना करून दिली जाणार आहे .वयोगट
७ ते १५ असेल .अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करावा उर्मिला लोटके 9834459038, टीना इंगळे 9881154489, सुजाता पायमोडे 9850177042
Post a Comment