अहमदनगर: स्वतःचे आत्मचरित्र लिहीत असताना आपल्यातील *मी* बाजूला ठेवत ते लिहणे ही खरोखरच तारेवरची कसरत आहे,त्याच बरोबर संघर्षमय जीवनाताच खरा आनंद असून त्यामधूनच माणूस समृद्ध होत असतो,आपल्याबरोबर सर्वानाच बरोबर घेऊन चालतो तोच खऱ्या सर्वार्थाने उंचीवर जाऊ शकतो असे प्रतिपादन श्री आर एन जाधव सेवानिवृत्त विक्रीकर उपायुक्त यांनी केले.
श्री अशोक शेजुळ सेवानिवृत्त विक्रीकर अधिकारी लिखित *कृपाछत्र* या पुस्तकाच्या विमोचन सोहळा मधुरंजनी सभागृह सावेडी येथे श्रीराम नवमीच्या मुहूर्तावर पार पडला.
या कार्यक्रमासाठी नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष श्री बाळासाहेब भुजबळ,प्रांत उपाध्यक्ष श्री माऊली मामा गायकवाड, नगरसेविका मा सौ दिपालीताई बारस्कर,नितीनजी बारस्कर,अमितजी वाघमारे,बाबुराव दळवी,बापूसाहेब औटी,पोस्टल संघटनेचे नेते श्री संतोष यादव उपस्थित होते.
श्री संतोष यादव आपल्या मनोगतात म्हणाले की, श्री अशोक शेजुळ यांनी आपल्या आयुष्यातील आजवरच्या प्रवासाचे यथार्थ वर्णन या पुस्तकात केलेले आहे.
स्वतः चा शोध म्हणजे आत्मचरित्र, प्रत्येक यशस्वी माणसाचे आयुष्य ही एक कादंबरीच असते त्यामुळे ती जर आत्मचरित्र स्वरूपात आली तर ती इतरांसाठी प्रेरणादायी ठरू शकते. श्री अशोक शेजुळ यांनी आपल्या सेवानिवृतीनंतर कृपाछत्र या पुस्तकातचे लिखाण सुरू केले व कोरोनाच्या कालखंडात ते पूर्ण केले व आज आपल्या सर्वांच्या साक्षीने त्याचे विमोचन होत आहे. असे सांगत त्याचे अभिनंदन केले.
याप्रसंगी श्री बाळासाहेब भुजबळ,श्री माऊली गायकवाड,बापू औटी,प्रकाश जोशी, सौ योगिता हुडे, बाळासाहेब शेजुळ,दिनेश विश्वासराव,बाबुराव दळवी,श्री मगरसर,श्री देशमुख साहेब ,रमेश भुजबळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
श्री अशोक शेजुळ यांनी आपल्या मनोगत सर्वाप्रति आभार व्यक्त करून धन्यवाद दिले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने ह भ प श्री शिंगोटे महाराज सेवानिवृत्त बँक अधिकारी यांचे प्रवचन संपन्न झाले.
यावेळी विक्रीकर विभागातील अनेक अधिकारी कर्मचारी,नाभिक समाजातील समाजबांधव,वाणीनगर परिसरातील सर्वच क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संतोष यादव यांनी तर प्रास्ताविक सौ विनिता शेजुळ,व आभार सौ विद्या यादव यांनी केले.
.....................
Post a Comment