भ्रष्टाचारी मंत्र्यांचा पर्दाफाश केल्याने सुडबुद्धीने आघाडी सरकार विरोधीकांवर कारवाई करत आहे -भैय्या गंधे
नगर - राज्यातील आघाडी सरकारचे एक-एक मंत्री भ्रष्टाचारामध्ये गुंतलेला असल्याने त्यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणेकडून कारवाई होत आहे. त्यामुळे या मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागत आहे. जो भ्रष्टाचार करणार त्याची चौकशी होणारच आणि दोषी असल्यास कारवाई ठरलेली आहे, त्यामुळे राज्यातील आघाडी सरकारमधील अनेक मंत्री भ्रष्टाचार करुन माया गोळा करत आहेत, याची केंद्रीय यंत्रणेकडून चौकशी होत असल्याचा राग मनात धरुन कारण नसतांना विरोधी पक्षांना पोलिसांमार्फत त्रास देण्याचा प्रकार सुरु झाला आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांचा भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केल्याने त्यांच्यावर सुडबुद्धीने पोलिसांनी चौकशीची नोटीस पाठवली आहे. कितीही सुडाचे राजकारण करा, पोलिसी ताकद वापरा, पाहिजे तेवढ्या चौकशा करा, परंतु यातून काहीही सिद्ध होणार नाही. आघाडी सरकारने केलेला भ्रष्टाचार भाजपा उघड केल्याशिवाय राहणार नाही, अशा शद्बात भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी आघाडी सरकारचा निषेध व्यक्त केला
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना महाविकास आघाडी सरकारने बेकायदेशीररित्या बजावलेल्या नोटीसीची शहर जिल्हा भाजपाच्यावतीने प्रोफेसर कॉलनी चौकात होळी करण्यात आली. याप्रसंगी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, संघटन सरचिटणीस विवेक नाईक, सरचिटणीस महेश नामदे, ज्येष्ठ नेते सुनिल रामदासी, नरेंद्र कुलकर्णी, संतोष गांधी, माजी उपमहापौर मालनताई ढोणे, नगरसेवक रविंद्र बारस्कर, मनोज कोतकर, उदय कराळे, विलास ताठे, गणेश साठे, वसंत राठोड, बाळासाहेब गायकवाड, ज्ञानेश्वर काळे, शिवाजी दहिंडे, जगन्नाथ निंबाळकर, अंजली वल्लाकट्टी, प्रिया जानवे, कुसूम शेलार, कालिंदी केसकर, सविता कोटा, वंदना पंडित, ज्योत्स्ना कुलकर्णी, पल्लवी जाधव, छाया रजपुत आदि उपस्थित होते.
यावेळी कार्यकर्त्यांनी देवेंद्रजी तुम संघर्ष करो, हम तुमारे साथ है, लढा देश हिताचा संघर्ष देवेंद्रजींचा, कर नाही त्याला डर कशाचा, दाऊद सरकारची पोलखोल करणारच, भ्रष्टाचारी ठाकरे सरकारचा निषेध असो, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी सुमित बटुळे, अॅड.गाडेकर, नितीन जोशी, विकास सांगळे, सुजित खरमाळे, बंट्टी ढापसे, अविनाश साखला, पंकज जहागिरदार, संजय ढोणे, अमोल निस्ताने, किशोर कटोरे, सतीश शिंदे, महेश तवले, मिलिंद भालसिंग, ऋषीकेश आगरकर, अमित गटणे, कल्पेश परदेशी, अभिषेक सोनवणे, राकेश भाकरे आदिंसह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
------
Post a Comment