नगर - द काश्मिर फाईल्स हा चिटपट नगरमध्ये प्रदर्शनासंदर्भात भाजपाच्यावतीने शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, ज्येष्ठ नेते वसंत लोढा, सुनिल रामदासी, सचिन पारखी, संतोष गांधी आदिंनी आशा स्क्वेअर चित्रपटगृहाचे मॅनेजरशी चर्चा केली.
याप्रसंगी भैय्या गंधे म्हणाले, जम्मू-काश्मिरमधील कश्मिरी पंडितांच्या जीवनावरील ‘द काश्मिर फाईल्स’ हा चित्रपट सध्या सर्वत्र अनेक कारणांनी गाजत आहे. या चित्रपटात त्यावेळी काश्मिरी पंडितवर कशाप्रकारे अन्याय झाला, त्यावेळीची परिस्थिती दिग्दर्शकांनी या चित्रपटात वास्तवदर्शि मांडली आहे, हा चित्रपट सर्वांनी पहावा, असाच आहे. तो नगरमध्येही प्रदर्शित व्हावा ही सर्वांची इच्छा असल्याने संबंधित चित्रपटगृहाशी चर्चा केली असून, लवकरच हा चित्रपट दररोज सायं.6 ते 9 या वेळेत या ठिकाणी प्रदर्शित होत असून, त्यातील एक प्रिमियम शो हा भाजपाच्यावतीने पुरस्कृत करणार असल्याचे सांगून चित्रपट प्रदर्शनाबाबत काही अडचणी असल्यास भाजपा चित्रपटगृहाच्या मागे खंबीरपणे उभी राहिल, असेही श्री.भैय्या गंधे यांनी सांगितले
Post a Comment