कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी मिळाल्याने प्रभागाचा विकास होत आहे याचे समाधान - नंदकुमार फणसे

नगर - महानगरपालिका प्रभाग दोन रचनेत  सर्वात मोठा आहे. जेवढा मोठा प्रभाग तेवढ्याच प्रमाणावर नगरसेवकांनी निधी उपलब्ध करुन मुलभूत प्रश्नांबरोबरच ओपन स्पेस, मंदिर परिसर सुशोभिकरणाची कामे झाल्यामुळे कॉलनीमधील सौंदर्यात भर पडली आहे. चारही नगरसेवकांनी कॉलनीमधील रस्ते, पाणी, स्ट्रीट लाईटचा प्रश्न सोडविले आहे. कार्यक्षम कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी आम्हाला मिळाले, त्यामुळे प्रभागाचा विकास झाला यांचे समाधान वाटते, असे प्रतिपादन सिद्धेश्वर सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार फणसे यांनी केले. 
पाईपलाईन रोडवरील एकवीरा चौकातील सिद्धेश्वर कॉलनीत ओपन स्पेसमध्ये असलेल्या विठ्ठल-रुख्मिणी मंदिराजवळील परिसरात पेव्हींग ब्लॉक बसविण्याचा शुभारंभ श्री फणसे यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी नगरसेवक विनित पाउलबुधे, सुनिल त्र्यंबके, निखिल वारे, बाळासाहेब पवार, संस्थेचे सेक्रेटरी पांडूरंग देशमुख, नोटरी पब्लिक अ‍ॅड.विक्रम वाडेकर, रावसाहेब निर्मळ, सुधाकर धस, डॉ.नरेंद्र चौधरी, भुषण शिंदे, दिलीप जोशी, डॉ.तुकाराम धोंडे, अजय बारवकर, प्रदीप वाखुरे, ज्ञानदेव शिरसाठ, मयुर फणसे, सुरेंद्र कोठावदे, सौ.पुजा वाडेकर, सौ.लता सोनवणे, सौ.विमल शिरसाठ, श्रीमती विमल वाडेकर आदिंसह नागरिक उपस्थित होते.
प्रास्तविकात अ‍ॅड.विक्रम वाडेकर म्हणाले, सिद्धेश्वर कॉलनीत मंदिर झाल्याने ज्येष्ठांची देव-दर्शनाची सोय झाली तर ओपन स्पेसमधील लहान मुलांना खेळणी बसविल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला. पेव्हींग ब्लॉकमुळे स्वच्छता राहील, परिसर सुशोभित होईल, असे सांगितले.
आपली मनोगत व्यक्त करतांना नगरसेवकांनी नागरिकांच्या सहकार्यामुळे विकास कामांना चालना मिळते. शहराचे आमदार संग्राम जगताप यांचा निधी मोठ्या प्रमाणावर मिळाल्यामुळे सध्या प्रत्येक भागात कामे सुरु आहेत, असे सांगितले.
सूत्रसंचालन पांडूरंग देशमुख यांनी केले तर नंदकुमार फणसे यांनी आभार मानले. 
-------

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post