युक्रेनमधून सुखरुप आलेल्या विद्यार्थ्यांची भाजपचे शहर जिल्हाअध्यक्ष भैय्या गंधे यांच्याकडून विचारपूस

 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वामुळे युक्रेनमधील भारतीय सुरक्षित - भैय्या गंधे

     नगर -    युक्रेन येथून युद्ध परिस्थितीतून सुखरूप परत आलेल्या आगरकर मळा येथील  प्रचित मुथीयान व सावेडी येथील कल्याणी राजू या विद्यार्थ्यांची भाजपा अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी भेट घेतली. यावेळी संघटन सरचिटणीस अ‍ॅड.विवेक नाईक, विधानसभा प्रमुख शशांक कुलकर्णी, उपाध्यक्ष संतोष गांधी, गौतम कराळे, योगेश काकडे, भारत-भारती चे अध्यक्ष राजू लक्ष्मण,  अमित चोरडिया, चेतन  मुथीयान, अमर मुथीयान, जवाहर सरनोत आदी उपस्थित होते.

     याप्रसंगी भैय्या गंधे म्हणाले, युक्रेन-रशियामध्ये सध्या जे युद्ध सुरु झाले आहे, त्यामुळे तेथील भारतीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या युद्धजन्य परिस्थितीत भारत सरकारने तेथील भारतीय नागरिक व विद्यार्थ्यांना आपल्या मायभुमीत आणण्यासाठी ‘ऑपरेशन गंगा’ सुरु केले. त्या अंतर्गत आजपर्यंत जवळजवळ 80 टक्के विद्यार्थी आपल्या घरी आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वामुळे भारतीय विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची हानी न होता, सर्वजण सुखरुप आपल्या घरी आले आहेत. अजुनही अडकलेल्या भारतीयांना आणण्याचे प्रयत्नसुरु असून, स्थानिक पातळीवरुन भाजपाचे पदाधिकारी यासाठी प्रयत्न करत आहेत. सर्व सुरक्षित येत आहे, याचे मोठे समाधान असल्याचे सांगितले.

     भारत सरकारने विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी केलेले प्रयत्न व स्थिती जाणून घेतली. ही युद्धस्थितीत कल्याणी व प्रचित भारतात वेळेत परत आले. कल्याणी व प्रचित ने यावेळी भारत सरकारचे आभार मानले. तसेच आवर्जून घरी येऊन भेटल्याबद्दल भैय्या गंधे यांचेही आभार मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post