विधान परिषद निवडणुकीत माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांना संधी देण्याचा ठराव

        नगर -  पक्षात बहुतांश वेळा जुने आणि नवीन कार्यकर्ते या विषयावरुन वाद होतात. मात्र पक्षाच्या गुणात्मक विकास करण्यासाठी आता जुने आणि नवे यांचा मेळ घालून काम करणार असून, जिल्ह्याचे प्रश्न आता थेट वरिष्ठ नेत्यांसमोर मांडण्याची संधी या पदाच्या माध्यमातून मिळाली आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांनी केले.
     प्रा.शिंदे यांची भाजपाच्या प्रदेश कोअर समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा पक्षाच्यावतीने पेमराज सारडा महाविद्यालयात सत्कार करण्यात आला.  याप्रसंगी आमदार मोनिका राजळे, माजी आ.शिवाजी कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, अकोलेच्या नगराध्यक्षा सोनाली नाईकवाडी, जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, शहर जिल्हा संघटक विवेक नाईक ,उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी, संतोष गांधी ,तुषार पोटे,वसंत लोढा, सुनिल रामदासी आदि उपस्थित होते.
     प्रा.शिंदे म्हणाले, एकेकाळी माजी उपमुख्यमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी मुंबई व महाराष्ट्र गुन्हेगारी मुक्त करण्याचे काम केले. आज मात्र दाऊतचा हस्तक मंत्रिमंडळात आहे. हा मंत्री आठ दिवसांपेक्षा जास्त काळ तुरुंगात आहे, तरी त्यांचे मंत्रिपद कायम आहे. याबाबत आता जनताच न्याय करेल, जनता भाजपासोबत आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पक्षाच्या या एकोप्यामुळे जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी सर्वाधिक सदस्य निवडून येतील. पक्षाने आजवर भरभरुन दिले आहे,त्यातून उतराई होण्यासाठी यापुढे सामान्य कार्यकर्ता केंद्रबिंदू ठेवून त्याला सन्मान मिळण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.

     याप्रसंगी  माजी आ.शिवाजी कर्डिले म्हणाले, येत्या जून महिन्यात विधान परिषदेची निवडणुका आहे. सध्या अहमदनगर जिल्ह्यात राम शिंदे यांच्या रुपाने पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता आमदार असणे काळाची गरज आहे. या करिता आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत प्रा.राम शिंदे यांना उमेदवारी देण्याचा ठराव करावा, असे त्यांनी सूचविले. तसेच अशी मागणी आम्ही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रक़ांत पाटील व विरोधी पक्षनेते देंवेद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहोत. या मागणीचा सर्वानुमते ठराव करावा, असे असे आवाहन त्यांनी केले. या विषयाला जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी अनुमोदन दिले. यावेळी कार्यकर्त्यांनी हात वरुन या विषयाला संमती दर्शविली.               

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post