अण्णा हजारेंचा आदर्श समोर ठेवून हिराबाईनीजनसेवेचे व्रत जोपासले - पोपटराव नगरे

अण्णा हजारेंचा आदर्श समोर ठेवून हिराबाईनी
जनसेवेचे व्रत जोपासले - पोपटराव नगरे
     नगर - घरातील कौटूंबिक जबाबदारी सांभाळून एका आदर्शव्रत शिक्षकाच्या पत्नी म्हणून समाजात वावरतांना अण्णा हजारे यांचा आदर्श समोर ठेवून त्याचे अनुकरण करीत श्रीमती हिराबाई घाडगे यांनी मनापासून जनसेवेचे व्रत जोपासले, असे प्रतिपादन अध्यक्ष पोपटराव नगरे यांनी केले.
     भिंगार येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती हिराबाई घाडगे यांच्या 79 व्या वाढदिवसानिमित्त शाल श्रीफळ व फूल देऊन सन्मान करण्यात आला.
     याप्रसंगी संघाचे अध्यक्ष पोपटराव नगरे, राज्य उत्पादन शुल्क माजी अधिक्षक विठ्ठल लोखंडे, सुभाष गोंधळे, रमेश भिंगारदिवे, सुरेश कानडे, कैलास बिडवे, रमेश त्रिमुखे, रमेश वराडे,  शिवाजी भांड, सुधाकर कटोरे, प्रकाश तरवडे, सुभाष होडगे, अशोक पवार, दिलीप कदम, शिवाजी लवांडे, प्रकाश घाडगे, पुनम घाडगे, प्रा.खान आदि उपस्थित होते.
     पुढे बोलतांना श्री.नगरे यांनी श्रीमती घाडगे यांनी जीवनात समाज कार्याला तर महत्व दिले मात्र घरातील जबाबदारी  पार पाडताना त्या खचल्या नाहीत. पतीच्या निधनानंतर मोठ्या धैर्याने ते समाज कार्याचा वारसा सांभाळीत आहे, हे कौतुकास्पद वाटते, असे सांगितले.
     श्रीमती घाडगे यांनी वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला. केक न कापता भिंगार येथील रोकडेश्वर मंदिरात गोर-गरीब भिक्षेकरुंना फळांचे वाटप केले. दोन घास कोणाच्यातरी मुखात देत जावे. भगवंतांचे नामस्मरण व अन्नदान केल्याने काही कमी पडत नाही. अण्णांप्रमाणे साधी राहणी व उच्च विचाराचे जेष्ठ नागरिक आमच्या संघात आहेत, याचा अभिमान वाटतो. पती एक आदर्श शिक्षक होते. जेवढे कडक-शिस्तप्रिय होते. तेवढेच माणुसकी व प्रेमळ स्वभावाने ते समाजप्रियही होते. त्यामुळे 2 मुली, एक मुलगा उच्च शिक्षित होऊन आज मोठ्या पदावर काम करतात हे घाडगे घराचे भुषण वाटते, असे त्या यावेळी सत्काराला उत्तर देतांना म्हणाल्या.
     सूत्रसंचालन सुभाष गोंधळे यांनी केले तर आभार तुषार घाडगे यांनी मानले.
--------
    
 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post