अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील न्यू आर्टस महाविद्यालयातील प्रशासकीय कर्मचारी संतोष कानडे यांना जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) येथे सह्याद्री संविधानिक राष्ट्रीय सेवारत्न पुरस्कार 2022 प्रदान करण्यात आला. प्रसिद्ध अभिनेते सिनेकलावंत किरण माने व मा.खा.निवेदिताताई माने यांच्या हस्ते कानडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सह्याद्री फिल्म अॅण्ड इव्हेंट मॅनेजमेंट कोल्हापूर या संस्थेच्या स्थापना दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार सोहळा पार पडला. कानडे गेल्या अठरा वर्षांपासून न्यू आर्टस महाविद्यालयात प्रशासकीय कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. अहमदनगर जिल्हा महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे सचिव म्हणून ते कार्य करत आहेत. कर्मचार्यांचे प्रश्न सोडविण्याकरिता शासन दरबारी पाठपुरावा करून, विविध आंदोलने त्यांनी केली आहेत. माजी विद्यार्थी संघ, शिवतेज मित्र मंडळ ट्रस्ट, सोमेश्वर कोविड केअर सेंटर, या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. गरजू घटकांना गरजेच्या वस्तू पुरविणे, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, शासनाच्या विविध योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचवून लाभ मिळवून देण्यासाठी ते कार्य करीत आहे.
वक्तृत्व, क्रीडा, सांस्कृतिक विविध स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. कोरोना काळातही त्यांनी अनेक गरजू घटकांना आवश्यक मदत पुरवली. रक्तदान शिबीर, मरणोत्तर अवयव दानचा संकल्प करुन सुरु असलेली जनजागृती, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व आरोग्य क्षेत्रात करत असलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना सह्याद्री संविधानिक राष्ट्रीय निमशासकीय सेवारत्न पुरस्कार 2022 प्रदान करण्यात आले आहे. यावेळी पुंडलिकराव जाधव, घनश्याम दरोडे, संजय कोलप, सह्याद्री संस्थेचे अध्यक्ष गौतम प्रज्ञासूर्य, गणेश वाईकर, अॅड. किरण जाधव, युवराज मोरे आदी उपस्थित होते.
कानडे यांना यापुर्वी शैक्षणिक क्षेत्रात मानाचे स्थान असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ गुणवंत सेवक पुरस्कार 2021 मिळाला आहे. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष नदंकुमार झावरे, उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव जे.डी. खानदेशे, सहसचिव अॅड. विश्वासराव आठरे, खजिनदार डॉ. विवेक भापकर सर्व पदाधिकारी विश्वस्त, सदस्य तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एच. झावरे, उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे, डॉ.संजय कळमकर, डॉ.अनिल आठरे, प्रबंधक बबन साबळे, अधीक्षक पी.सी. म्हस्के, आर.एम. पाटील, गणित विभागप्रमुख डॉ.एस.बी. गायकवाड आदींसह सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.
Post a Comment