साहेबराव कजबे यांचे समाजकार्य इतरांपेक्षा काकणभर सरस:- शेंडी सोसायटीत विजया निमित्त अहिल्यादेवी पतसंस्थेत सत्कार

 
नगर :सामाजिक कार्यकर्ते साहेबराव सखाराम कजबे हे भेदभाव न करता सर्वांना बरोबर घेऊन समाजात कार्य करीत आहेत अहिल्यादेवी पतसंस्थेचे संस्थापक संचालक म्हणून संस्थेचे हित जोपासताना समाजातल्या सर्व घटकांना समान न्याय देण्याचे धोरण राबवण्याचा आग्रह ते धरतात त्यांची शेंडी सोसायटीवर बहुमताने झालेली निवड ते सार्थ ठरवून आपल्या कामाचा ठसा तेथेही उमटवतील असा विश्वास आहिल्यादेवी पतसंस्थेचे चेअरमन रानबा कुशाबा कजबे यांनी व्यक्त केला.शेंडी (ता.नगर) विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणूकीत बहुमताने  संचालक पदी निवडून आल्याबद्दल साहेबराव कजबे यांचा  पुण्यश्लोक आहिल्यादेवी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने हृद्य सत्कार करण्यात आला यावेळी चेअरमन रानबा कजबे बोलत होते.

पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन दिलीप त्रिंबक तागड, संचालक सर्वश्री ज्ञानेश्वर अर्जुन कजबे, गुलाब सिताराम कजबे, रामदास दत्तात्रय लेंडे, रावसाहेब गंगाराम भांड, कैलास भिमराज कजबे, संचालिका सौ.रंजना सुभाष कजबे, रंजना मच्छिंद्र गायकवाड, व्यवस्थापक सौ.वैशाली अमोल गाडे, प्रतिनिधी सुनील शिंदे ,अनंत मनवेलिकर आदी यावेळी उपस्थित होते.

साहेबराव हे पोलीस पाटील असून भिस्तबाग परिसरासह ग्रामीण भागात ते कार्यरत आहेत. इतरांपेक्षा त्यांचे कार्य काकणभर सरस आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही असे गौरवोद्गार पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन दिलीप तागड यांनी काढले.प्रारंभी अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.चेअरमन व व्हाईस चेअरमन यांच्या हस्ते साहेबराव कजबे यांचा सत्कार करण्यात आला.उपस्थित संचालक प्रतिनिधींची यावेळी समयोचित भाषणे झाली.व्यवस्थापिका सौ.गाडे यांनी स्वागत केले तर शेवटी रावसाहेब भांड यांनी आभार मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post