वरिष्ठ डाक अधिक्षक रामकृष्णा
विशेष मोहीम
आधार मोबाइल संलग्न करण्याची सुविधा
पोस्ट खात्याने काही निवडक पोस्ट कार्यालयामार्फत ०ते५ वयोगटातील लहान मुलांचे नविन आधार कार्ड म्हणजे बाल आधार काढण्या सोबतच आधार कार्डला मोबाइल नंबर संलग्न करण्याबाबतची विशेष मोहीम हाती घेतली आहे त्यामुळे ५वर्षापर्यंतच्या वयोगटातील लहान मुलांना नवीन आधार कार्ड केंद्र किंवा ई_सेवा केंद्र येथे जाण्याची आवश्यकता नसुन त्यांचे आधार कार्ड आता पोस्टमन मार्फत काढून दिले जाणार असल्याची माहिती नगर येथील प्रधान डाकघराचे वरिष्ठ अधिक्षक एस रामकृष्णा यांनी दिली आहे केवळ लहान मुलाचा फोटो आई किंवा वडिलांचाआधार क्रंमाक तसेच बाळाचा जन्म दाखला यांच्या आधारे पोस्टमन त्यंच्या आधार कार्डची नोंदणी करुन देतील बुधवार दिनांक २/२/२०२२रोजी नालेगाव परिसरातील चि.शिवदत्त राजेश जाधव व सुमेधा राजेश जाधव या दोन भावा बहिणींचे आधार कार्डनोदंणीची प्रक्रिया थेट घरपोहोच स्वरुपात पोस्टमन संजय परभणे यांनी केली ही सुविधा पुर्णपणे मोफत असुन त्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही पोस्टामार्फत सुरु झालेल्या या नविन सेवेमुळे आता लहान मुलांचे आधार कार्ड काढणें अत्यंत सोपे झालेले आहे तरी सर्वांनी पोस्टमन बरोबर संपर्क साधावा
Post a Comment