नगर - अहमदनगर शहरात काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षात वॉर्ड नं.9 मधील कार्यकर्त्यानी प्रवेश केला, याप्रसंगी पोपट पाथरे यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे जाहीर केले, परंतु वास्तविक मी मनसेचा सच्चा सैनिक असून, मी काँग्रेस काय कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही, असा खुलासा मनसेचे उप शहराध्यक्ष पोपट पाथरे यांनी केला आहे.
प्रसिद्धी पत्रकात ते म्हणाले की, नुकताच काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केलेल्या कार्यकर्ते आणि माझा कुठलाही संबंध नाही. 16 वर्षांपासून मी मनसेत शहर उपाध्यक्ष म्हणून काम करत आहे. आजपर्यंत काँग्रेसचा आणि माझा संबंध नाही. केवळ प्रसिद्धीसाठी माझे नाव घेऊ नये. दर दोन दिवसाला नेता बदलणार्यांचे नेतृत्व मी कधी केले नाही आणि करणारही नाही. मी मनसे पक्षाबरोबर एकनिष्ठ आहे. पक्षप्रमुख राज ठाकरे यांचा सच्चा मनसैनिक आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या लोकांशी माझा संपर्क देखील आले नसून, माझे कार्यकर्ते म्हणून जर काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या लोकांनी काँग्रेसच्या पदाधिकार्यांमध्ये गैरसमज निर्माण केला असल्याचेही श्री.पाथरे यांनी म्हटले आहे.
---------
Post a Comment