बाल आधार कार्ड सुविधांचा लाभ घेण्याची संधी
- आ.संग्राम जगताप
नगर - सध्या नागरिकांना प्रत्येक कामासाठी आधार कार्डची आवश्यकता भासते. नवीन आधार कार्ड काढण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, पण सावेडीमध्ये साई-संघर्ष प्रतिष्ठान व पोस्ट कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांच्या पुढाकारातून नगरसेवक विनित पाउलबुधे, निखिल वारे, बाळासाहेब पवार यांच्या सहकार्याने बाल आधार कार्ड सुविधा उपलब्ध करुन सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. या योजनेचा लाभ घेण्याची ही चांगली संधी आहे, त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
वसंत टेकडी येथील साई-मंदिरात विशेष माहिमेअंतर्गत बालकांचे बाल आधार मिळवा या साई-संघर्ष साामाजिक प्रतिष्ठान व पोस्ट कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेल्या उपक्रमाचा शुभारंभ आ.संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी नगरसेवक सुनिल त्र्यंबके, विनित पाउलबुधे, निखिल वारे, बाळासाहेब पवार, प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश पिंपळे तसेच डाक विभागाचे एस.बी.सोनवणे, आयपीपी बँकेचे व्यवस्थापक श्री.भुतकर, मंगेश वानखेडे, तानाजी कराळे, ओंकार वाघुले, सचिन मानाडे, दिपक शंगाल, किशोर भुजबळ, चंद्रकांत दुलम आदि उपस्थित होते.
आ.जगताप पुढे म्हणाले सुनिल त्र्यंबके यांचे काम समाजासाठी प्रेरणा देणारे आहे. साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानने वेगवेगळे उपक्रम राबवून आदर्श निर्माण केला आहे. आता जन्मत: ते 5 वर्षापर्यंतच्या बालकांचे त्वरित बाल आधार कार्ड उपलब्ध करुन देण्याचा वेगळा उपक्रम जनता दरबाराच्या माध्यमातून सुरु केला हे कौतुकास्पद काम असल्याचे सांगितले.
प्रास्तविकात नगरसेवक सुनिल त्र्यंबके म्हणाले, साई बाबांच्या आशिर्वादाने समाजकार्य करण्याचे मला बळ मिळाते. दर सोमवारी जनता दरबाराचे आयोजन करुन त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्याच सोमवारी प्लेसमेंटमध्ये 47 लाभधारकांना नोकरी मिळाली. या दुसर्या सोमवारी बालकांचा आधार कार्ड योजना मोहिमेत 300 जणांची नोंदणी झाली. नागरिकांच्या सेवा-सुविधेसाठी प्रतिष्ठान नेहमीच लाभदायी उपक्रम राबवित असल्याचे सांगितले.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश पिंपळे म्हणाले, या बाल आधार कार्ड योजना मोहिमेत मोफत शून्य ते 5 वर्षापर्यंत मुलांना आधार कार्ड देण्याच्या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जनता दरबाराच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडविण्याचा आमचा कायम प्रयत्न राहील. प्लेसमेंटच्या माध्यमातून युवकांना नोकरी मिळवून दिल्याचे समाधान वाटते.
या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी स्वागत करुन पोस्ट विभाग व साई संघर्ष प्रतिष्ठानला धन्यवाद दिले.
--------
Post a Comment