हकिगत अशी कि, दिनांक २4 रोजी फिर्यादी श्री. आनंदा बबन घुगार्डे, वय ५४, रा. घुगार्डेवस्ती, चास, ता. नगर हे कुटूंबासह कामानिमित्त बाहेर गेले असतांना अनोळखी चोरट्यांनी त्यांचे बंद घराचे पाठीमागील दरवाजाची कडी हात घालून उघडुन घरात प्रवेश करून धरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण २,३२,६००/- रु.किंमतीचा ऐवज घरफोडी करून चोरुन नेला होता. सदर घटनेबाबत नगर तालुका पोलीस स्टेशन येथे गुरनं. १०८/२०२२ भादवि कलम ४५४, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तसेच यापूर्वीही श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, नगर तालुका, पावडी, शेवगांव, व
राहुरी परिसरामध्ये अशा प्रकारचे जबरी चोरी व घरफोडीचे गुन्हे घडलेले असल्याने मा. पोलीस अधिक्षक सो, अहमदनगर
यांचे आदेशाने श्री. अनिल कटके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी गुन्ह्याचे समातर तपासकामी
स्थानिक गुन्हे शाखेचे स्वतंत्र पथक नेमून तपास करुन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सुचना दिल्या होत्या.
नमुद सुचना प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि/सोमनाथ दिवटे, पोसई/सोपान गोरे, पोहेकॉ/सुनिल चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, मनोज गोसावी, दत्ता गव्हाणे, विजय वेठेकर, बबन मखरे, संदीप घोडके, संदीप पवार, विश्वास बेरड, भाऊसाहेब कुरूंद, देवेंद्र शेलार, पोना/शंकर चौधरी, ज्ञानेश्वर शिंदे, सचिन आडबल, संदीप चव्हाण, विजय ठोंबरे, रवि सोनटक्के, दिपक शिंदे, लक्ष्मण खोकले, विशाल दळवी, पोकॉ/रविंद्र घुंगासे, योगेश सातपुते, जॉलिदर माने, रोहित मिसाळ, राहुल सोळुंके, आकाश काळे, सागर ससाणे, मयूर गायकवाड, रणजित जाधव, मच्छिंद्र बर्डे, मेघराज कोल्हे, | विनोद मासाळकर, चापोहेकॉ/संभाजी कोतकर, बचन बेरड व चंद्रकांत कुसळकर असे अधिकारी व अंमलदार हे गुन्ह्याचा तपास करीत असताना पोनि/अनिल कटके यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि. वरील नमुद गुन्हा हा आष्टी, जिल्हा बीड येथील सराईत गुन्हेगार राम बाजीराव चव्हाण, रा. आष्टी, जिल्हा बीड व त्याचे साथीदारांनी मिळून केलेला असून राम चव्हाण व त्याचे साथीदार हे चोरलेले सोन्याचे दागिण्यांची विल्हेवाट लावण्यासाठी लाल व काळ्या रंगाच्या शाईन व यूनिकॉन मोटार सायकलवर अहमदनगर येथे येणार आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार अशांनी मिळून दोन पंच व पंचनामा करण्याचे साहित्यासह शासकिय वाहनाने आठवड घाट, नगर जामखेड रोड येथे जावून शासकिय वाहने आड बाजुला लावुन व सापळा लावला असतांना मिळालेल्या माहितीचे आधारे आरोपीताचा शोध घेत असतांना आष्टी कडुन अहमदनगरच्या दिशेने तीन मोटार सायकली त्यात एक लाल व एक काळ्या रंगाची हिरो होंडा शाईन व एक होंडा कंपनीची युनिकॉन मोटारवर प्रत्येकी दोन-दोन इसम येत असतांना दिसले पोलीस पथकाची खात्री होताच सदर इसमांना थांबण्याचा इशारा करताच ते पळून जाण्याचे तयारीत असतांना पोलीस पथकाने दोन मोटार सायकलवरील चार संशयीत इसमांना पाठलाग करून, शिताफीने ताब्यात घेतले. तसेच त्यांचे पाठीमागील युनिकॉन मोटार सायकलवरील दोन इसम मोटार सायकल तेथेच टाकुन घाटामध्ये पळू लागले पोलीस पथकने त्यांचा पाठलाग केला. परंतु ते मिळुन आले नाही. दोन शाईन मोटार सायकलवर मिळून आलेल्या इसमांना पोलीस पथकाने स्वतःची व पंचाची ओळख करुनदेवून त्यांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्याचे नाव १) राम बाजीराव चव्हाण वय २०, रा. आष्टी, जिल्हा बीड, २) तुषार हवाजी भोसले, रा. पिंपरखेड, ता. आष्टी, जि. बीड, ३) प्रविण उर्फ भाज्या हबाजी भोसले, ४) विनाद हबाजी भोसले, दोन्ही रा. पिंपरखेड, ता. आष्टी जिल्हा बीड असे असल्याचे सांगितले. पळून गेलेल्या इसमांचा शोध घेत आहोत.
मिळून आलेल्या वरील संशयीत चार इसमांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांचे कब्जात मिळून आलेल्या मोटार सायकलचे सिटाखाली व तुषार भोसले याचे कब्जातील कापडी पिशवीमध्ये विविध प्रकारचे सोन्याचे दागिने त्यामध्ये राणीहार, गंठण, मणीमंगळसुत्र, कानातील झुंबर, अंगठ्या, चैन, टॉप्स, नेकलेस, डोरले, कानातील वेल, बोरमाळ बांगड्या असे एकुण ४२ तोळे वजनाचे (४९९ ग्रॅम वजनाचे) तसेच राम चव्हाण याचे अंगझडतीमध्ये ३९,५००/- रु. रोख रक्कम व तीन मोटार सायकल असा एकूण २३,५२,५००/-रु.कि.चा मुद्देमाल मिळुन आला. नमुद मुद्देमाल पंचा समक्ष जप्त करण्यात आला आहे. नमुद मुद्देमालाबाबत संशयीत इसमांकडे विचारपुस करता ते उडवा उडवीची उत्तरे देऊ लागले त्यांना अधिक
विश्वासात घेऊन विचारपुस करता त्यांनी मागील सुमारे २/३ महिण्यापासून अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, कर्जत,
जामखेड, नगर तालुका, शेवगांव, पाथर्डी, व राहुरी या ठिकाणी दिवसा बंद घराचे कडीकोंडा, कुलूप तोडुन दागिने व रोख
रक्कम चोरी केल्याचे व सदर चोरी केलेले दागिने हे अहमदनगर येथे मोडण्यासाठी चाललो असल्याचे सांगीतले. आरोपींनी दिलेल्या माहिती वरुन अहमदनगर जिल्हयात विविध पोलीस स्टेशनमध्ये मागिल २-३ महिन्यात दाखल गुन्हे अभिलेख तपासले असता ९७ ठिकाणी गुन्हे दाखल असुन सदर गुन्हे वरील आरोपींनी केल्याचे निष्पन्न झालेले आहे.
Post a Comment