गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडूननगरच्या भोसले परिवाराचे सांत्वन

नगर  ( विजय मते) गोवा विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी खाजगी दौर्‍यात नगरला येऊन भोसले परिवाराचे सांत्वन केले. 
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सावेडी उपनगरातील गुलमोहोर रोडवरील नवलेनगर येथील डॉ.नितीन भोसले यांच्या वडिलांचे कोरोनाने निधन झाले. स्व.दिनकर गंगाराम भोसले हे रेसिडेन्शीअल ज्युनियर कॉलेजला पर्यवेक्षक म्हणून सेवेत होते. सेवानिवृत्तीनंतर विविध विषयांवर लेखन करीत. त्यांच्या निधनामुळे भोसले परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला. 
डॉ.नितीन व मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे 1992 ते 1997 काळात कॉलेजमध्ये एकत्र होते. रुम पार्टनर असल्याने एकमेकांच्या घरी जाणे - येणे होते. स्व.दिनकर भोसले यांनी प्रमोद यांना त्यावेळी ‘तु खूप मोठा डॉक्टर होऊन मोठा अधिकारी होशील’ असा आशिर्वाद दिला होता. 
आज मित्र प्रेम व काकांचा आशिर्वादाने गोव्यासारख्या राज्याचा मुख्यमंत्री झालो हे मी विसरु शकत नाही. काकांचे निधन हा एक धक्का होता, अशी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करत काकांना श्रद्धांजली अर्पण करुन परिवाराचे सांत्वत केले.
यावेळी श्रीमती कल्पना भोसले, सौ.निलिमा पवार, किरण पवार, अभिजित दरेकर व कुटूंबातील सदस्य उपस्थित होते. 
-

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post