नगर-:-माझे मंत्रीपद हे फक्त ओबीसींच्या हितासाठी पणाला लावीत आहे. माझ्या आयुष्यातील शेवटच्या श्वासापर्यंत राज्यातील नव्हे तर संपूर्ण देशातील ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणार, असे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी केले.
अहमदनगर जिल्ह्यातील हजारो ओबीसी कार्यकर्त्यांनी राज्याव्यापी ओबीसी बहुजन परिषदेला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी बारा बलुतेदार महासंघ, ओबीसी-व्हीजे-एनटी, नाभिक महामंडळ आदिंच्या जिल्हाध्यक्षांसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी नगर जिल्ह्यातील या लक्षणिय उपस्थितीबद्दल समाधान व्यक्त करुन जिल्ह्यात चांगले काम होत असल्याचे ना.वडेट्टीवार आवर्जुन म्हणाले. यावेळी बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड, नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, अनुरिता झगडे उपस्थित होते.
या परिषदेत मार्गदर्शन करतांना ना.वडेट्टीवार यांनी बारा बलुतेदारांना व्यावसायिक दृष्टीकोनातून सक्षम करण्यासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणार तसेच शिवरत्न जिवाजी महाले, वैराग्यमूर्ती गाडगे बाबा स्मारकासाठी निधी उपलब्ध करणार असल्याचे जाहीर केले. सामान्य कार्यकर्त्यांची जाणीव ठेवून ओबीसी, व्हीजेएनटी बहुजन परिषद निर्माण केली. यामध्ये सर्व जात समुहांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले जाईल, असे सांगितले.
या परिषदेला राज्याचे ओबीसी नेते कल्याण दळे, प्रा.सुशिला मोराळे, शब्बीर अन्सारी, आ.राजेश राठोड, माजी आ.रामराव वडकुते, महाज्योतीचे संचालक लक्ष्मण वडले, म्हाडाचे अध्यक्ष शिवाजी ढवळे, प्रा.लक्ष्मण हाके, संदेश चव्हाण, अरुण खरमाटे, संजय विभुते, शशिकांत आमने, दत्तात्रय चेचर, सतिष दरेकर, सतिष कसबे, देवराव सोनटक्के, चंद्रकांत गवळी, साहेबराव कुमावत, विशाल जाधव, किसनराव जोर्वेकर, दामोदर बडवे, प्रताप गुरव, धनंजय शिंगाडे, भगवान श्रीमंदिलकर, रविंद्र बागुल, साहेबराव पोपळघट, मुकुंद मेटकर, रोहित प्रजापती, साधना राठोड, भारती सोनवणे, निरजा आम्बेरकर, सह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांचे बारा बलुतेदार संघाचे अध्यक्ष माऊली गायकवाड यांनी आभार मानले.
-------
Post a Comment