ऐतिहासिक वैभवासाठी झटणारा थोर माणूसः- स्व. सुरेश जोशी

 ऐतिहासिक वैभवासाठी झटणारा थोर माणूसः- स्व. सुरेश जोशी




 ऐतिहासिक अहमदनगरच्या इतिहासास उजेडात आणण्यासाठी फार मोठ्या थोर माणसांची मालिका दिसून येते.  सय्यद अली तबातबा, फरिस्ता, ...डाॕ. पी.एम. गद्रे, डाॕ. कुंटे, प्रा. अशोक नेवासकर , श्री सुरेश जोशी......             इतिसातील छोट्याशा माहितीसाठी मैलो ना मैल पायी प्रवास...मिळेल तेथून वस्तू गोळा करणं आणि त्यांच्या परवानगीनं त्या वस्तू वस्तूसंग्रहालयात दाखल करण फार मोठं जिकरीचं काम असतं. यावेळी संशोधकाचे प्रचंड हात होतात...त्या वाटेवरनं चालणं त्यासाठी इतिहास अंगात आणि रोमारोमात भिन्नलेला असला म्हणजे त्या शारीरिक कष्टाचंही काहीही वाटेनासं होतं. इतिहास अभ्यास वा संशोधन हे कार्यच मोठी तपश्चर्या वा साधना आहे...तात्यांनी ती केली आणि आम्हांला शिकवलीही...मलाही त्यांचा सहवास व मार्गदर्शन मिळाले. सुरेश जोशी आणि प्रा. अशोक नेवासकर हे इतिहासातील दोन थोर माणसं ....दोन्हीहीचा स्वभाव,कार्यप्रणाली भिन्न माञ हेतु एकच. या पुरातत्वीय अवशेषांना लोकांसमोर आणून जतन,संवर्धन करणं.  स्व. सुरेश जोशीनी प्रचंड भटकंती केली. ऐतिहासिक वस्तू....ऐतिहासिक वास्तू यांच्या शोधात झपाटल्यागत  बेभान होऊन झोकुन देऊन काम करणाऱ्या पिढीतले स्व. सुरेश जोशी साहेब.....ऐतिहासिक तात्यासाहेबांना भेटलो तो प्रसंग मोठा चमत्कारिक होता. सन 1996 ला अहमदनगर काॕलेजला शिकत होतो. एके दिवशी दुपारी काॕलेजमधून हातमपु-यात आलो. तेथील ती भव्य दिव्य ऐतिहासिक वास्तू पाहिली...पहिल्यांदा येत होतो. तात्या ऐका मोठ्या अंधाऱ्या खोलीत एकटेच बसलेले. चौहीकडं अंधार दाटलेला कदाचित लाईट गेलेली असावी. अत्यंत शांत,एकांत वातावरण होतं. ते गुढ भासत होतं. शेकडो पुरातत्वीय वस्तू आणि वास्तूंना उजेडात आणणारा हा ऋषीतुल्य महान इतिहास पुरुष पाहून मी अंचबित झालो. मी बोलता जाहलो...मी नवनाथ वाव्हळ...घाटातल्या करंजीचा .... मी इतिहास विषयाचा विद्यार्थी . पराक्रमी होळकर या पुस्तकावर काम करता होतो...मीच बराच वेळ बोलत होतो...तात्या शांतपणे ऐकत होते. मग सावकाश मोजकं बोलले...पुढं भेटी गाठी वाढल्या... त्यावेळी एक संदेश दिलेला आजही स्मरतो...." इतिहास संशोधका जवळ मोठा संयम असला पाहिजे तोच यशस्वी होतो..." अजूनही बरच काही....स्व. सुरेशी जोशी साहेबांनी जीवापलिकडं जपलेली ही विरासत आज डाॕ. संतोष यादव साहेब ,श्रीयुत नारायणराव, आवारी साहेब, इतर सर्व टिम सक्षमपणे डाॕ. साताळकर साहेब आणि मा.  जिल्हाधिकारी साहेबांच्या नेतृत्वाखाली संभाळत आहे हे पाहुन इतिहास संशोधक म्हणून मोठं समाधान वाटतं..... पुन्हा तात्यांच्या जयंती दिनी आठवणीना उजाळा मिळतोय.... माझ्या ऐतिहासिक ज्ञानात भर टाकण्यास अशी थोर माणसं भेटली..पुढं न्यू आर्टस महाविद्यालयात प्रा. शाहणे सरांचा वैभवशाली वारसा तितक्याच समर्थपणे प्रा. यु. आर. ठुबे सर ,डाॕ. किसन अंबाडे सर,डाॕ. साळे मॕडम,प्रा. होळकर अशा तोलामोलाच्या ज्ञानयाञी प्राध्यापकांमुळे   इतिहास संस्कार झाल्यानं इतिहास प्राण वायू बनलाय....तर स्व. सुरेश जोशी सरांच्या पविञ स्मृतीना विनम्र अभिवादन.....प्रा. नवनाथ काशिनाथ वाव्हळ,इतिहास संशोधक

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post