पुजारी संगमनाथ महाराज यांचे वाढदिवसानिमित्त मान्यवरांसह भाविकांकडून अभिष्टचिंतन

 



     नगर - श्री विशाल गणेश हे शहराचे ग्रामदैवत आहे, नवसाला पावणारा श्री विशाल म्हणून ख्याती असल्याने अनेक भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी नियमित येत असतात. भाविकांच्या सहकार्याने मंदिराचा झालेला जिर्णोद्धार हा नेत्रदीपक असा झाला आहे. मंदिरातील नित्य पुजेचे कार्य पुजारी संगमनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली नित्यनियमाने सुरु आहे. मंदिराचे पावित्र्य जपण्यासाठी ते घेत असलेले परिश्रम मोलाचे आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थानचे कार्य उत्कृष्टपणे सुरु आहे. मंदिर निर्माण कार्यातील त्यांचा सहभाग अनमोल असाच आहे. श्री विशाल गणेशाच्या आशिर्वादाने भाविकांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरत आहे, असे प्रतिपादन श्री विशाल गणेश मंदिर देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर यांनी केले.


     श्री विशाल गणेश मंदिराचे पुजारी संगमनाथ महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा देवस्थानच्यावतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे, विश्वस्त पांडूरंग नन्नवरे, बापूसाहेब एकाडे, रंगनाथ फुलसौंदर, विजय कोथिंबीरे, गजानन ससाणे, भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, बाळासाहेब बोराटे, विक्रम राठोड, दत्ता जाधव आदि उपस्थित होते.


     यावेळी पद्मश्री पोपटराव पवार, उद्योग नरेंद्र फिरोदिया, महापौर रोहिणी शेंडगे आदिंनी पुजारी संगमनाथ महाराज यांचे अभिष्टचिंतन करुन आशिर्वाद घेतले. तसेच उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post