वाळवा (वार्ताहर)
घबकवाडी ता. वाळवा, जि. सांगली येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने बुधवार १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ठिक ७:०० वाजता औरंगाबाद (पाटोदा) चे आदर्श सरपंच श्री. भास्कराव पेरे - पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले असल्याची माहिती घबकवाडी गांवचे सरपंच श्री. संजय पांडूरंग कदम (बापू) यांनी दिली.
महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. जयंतरावजी पाटीलसाहेब व सांगली जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष श्री. देवराजदादा पाटील यांच्या वाढ दिवसा निमित्त या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून वाळवा शिराळा तालुक्यातील सर्व गावातील सरपंच, सदस्य व ग्रामस्थ यांनी लाभ घ्यावा असे आवाहन घबकवाडी गावातील सर्व ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच श्री. संजय कदम यांनी केले आहे.
या जाहिर व्याख्यान कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी घबकवाडी ग्रामपंचायतची सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.
Post a Comment