नगर - शाळेत असताना विद्यार्थ्यांना फक्त अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत करुन यशाचे ध्येय साध्य करायचे असते. सध्या शिक्षणाला खूप महत्व आहे. त्याला वयाची मर्यादा नसते. लग्नानंतरही 10 वी, 12 वी परिक्षा देऊन पदवीधर शिक्षणपूर्ण करणार्या स्त्रीया आजही आहेत. लग्नानंतर कुटूंबाची जबाबदारी सांभाळून सेट सारख्या अवघड परिक्षेत श्रद्धाताईंनी मिळविलेले यश कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांनी केले.
लक्ष्मीनगर येथील श्रद्धा अभिषेक खिलारी यांनी नुकत्याच झालेल्या सेट परिक्षेत पर्यावरण शास्त्र विषयात 64 टक्के गुण मिळवून यश मिळविल्याबद्दल प्रभाग दोनचे नगरसेवक सुनिल त्र्यंबके, विनित पाउलबुधे, निखिल वारे, बाळासाहेब पवार यांनी सत्कार केला व त्यांच्या यशाचे कौतुक केले.
याप्रसंगी एकनाथ खिलारी, कौशल्या खिलारी, अभिषेक खिलारी, सुर्यकांत झेंडे, राजेंद्र शेटे, नवनाथ दळवी, दत्तात्रय पोंदे आदि उपस्थित होते. यावेळी नगरसेवक विनित पाउलबुधे, निखिल वारे, बाळासाहेब पवार, आदिंनी मनोगतातून श्रद्धाताईंनी कुटूंबाचे स्वास्थ व्यवस्थीत ठेवून आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रीत ठेवले. मुला-बाळांचे आरोग्य अबाधित ठेवून अभ्यासाला वेळ दिला. कुटूंबातील सासू-सासर्यांचे पाठबळ त्यांना मिळाले. सेट परिक्षेत चांगले गुण मिळवून खिलारी कुटूंबाचे नाव उंचावले याचा आम्हाला अभिमान वाटतो, असे नगरसेवकांनी म्हटले.
सत्कारास उत्तर देतांना श्रद्धा खिलारी म्हणाल्या की, विवाहापूर्वी मला शिक्षणाची आवड होती. आई-वडिलांचे मार्गदर्शन होते, त्यामुळे लग्नानंतर ही पती अभिषेक यांनी माझी पुढील शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण केली. सेट परिक्षेत मला मिळालेले यश त्यांचे पाठबळ असल्याने मिळाले. मला आता डॉक्टरेट पदवी पूर्ण करुन शैक्षणिक क्षेत्रात चांगले काम करण्याचा माझा मानस आहे. हे स्वप्न देखील माझे पूर्ण होईल असा मला आत्मविश्वास असल्याने त्यांनी सांगितले.
-
Post a Comment