खेळाडूंना प्रोत्साहन देऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तयार करु -नूतन क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले
नगर - नूतन जिल्हा क्रीडा अधिकारी सौ.भाग्यश्री बिले यांचे जिल्हा ऑलपिंक संघटना, एकविध क्रीडा संघटना, क्रीडा मंडळे यांच्यावतीने करण्यात आले. याप्रसंगी रावसाहेब बाबर, संजय साठे, शैलेश गवळी, संजय धोपावकर, बी.जी.गायकवाड, बळीराम सातपुते, सचिन काळे, प्रशांत पोटोळे, सौरभ सानप, देशमुख सर आदि उपस्थित होते.
याप्रसंगी क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले म्हणाल्या मी स्वत:एक राष्ट्रीय खेळाडू असून, आजही आपण नवोदित खेळाडूंना मागर्र्दर्शन करत आहे. खेळाडूंच्या समस्यांची मला जाणिव आहे. त्या दूर करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करील. त्याचबरोबर जिल्हा क्रीडा संकुलामध्ये विविध खेळांसाठी अद्यावत साहित्यांसह मैदाने तयार करण्यास प्राधान्य राहील. त्याचबरोबर जास्तीत जास्त राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा जिल्ह्यात होण्यासाठी सहकार्य करु, अशी विविध योजना पुढील काळात राबविण्याचा मानस असून, जिल्ह्यातील क्रीडा संघटना, मंडळे यांनीही क्रीडा कार्यालयास सहकार्य करुन जिल्ह्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तयार करु या, असे सांगितले.
याप्रसंगी रावसाहेब बाबर यांनी विविध क्रीडा संघटनांच्या पदाधिकार्यांची ओळख करुन देऊन जिल्ह्यातील क्रीडा विश्वाचा अहवाल सादर केला. तसेच जिल्ह्यातील नवोदित खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी क्रीडा कार्यालयाच्या सहकार्य पोहचविण्याचा सर्वच संघटना प्रयत्न करतील, असे सांगितले.
यावेळी क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, खेळाडू व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.
Post a Comment