अहमदनगर दि. 20 (जिमाका वृत्त) - अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील नव उद्योजकांसाठी असलेल्या स्टँड अप इंडिया या योजनेच्या लाभासाठी धनगर समाजातील नव उद्योजक महिला ही पात्र ठरणार आहे. तेव्हा महिला नव उद्योजकांनी समाकल्याण विभागाकडे अर्ज सादर करावेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर 125 व्या जयंती वर्षानिमित्त 2015 मध्ये केंद्र शासनाने स्टँड अप इंडिया ही योजना सुरू केली आहे. या योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील नव उद्योजकांना उद्योगासाठी प्रकल्प मुल्याच्या 15 टक्के रक्कम अनुदान स्वरूपात शासनामार्फत देण्यात येते. नव उद्योजकांनी प्रकल्प मुल्याच्या 10 टक्के स्वहिस्सा भरल्यानंतर या योजनेत 75 टक्के रक्कम बँकेमार्फत मंजूर करण्यात येते.
धनगर समाजातील पात्र नव उद्योजक महिलांनी सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय, अभिविश्र्व कॉम्प्लेक्स, बोल्हेगांव फाटा, नगर-मनमाड रोड, अहमदनगर या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन ही श्री. देवढे यांनी केले आहे.
Post a Comment