शिक्षक सेनेच्यावतीने अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांना निवेदन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत तातडीने निर्णय घ्यावा- प्रा.अंबादास शिंदे



     नगर - अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ज.मो.अभ्यंकर नगरमध्ये आले असता त्यांचे स्वागत करुन शिक्षक सेनेच्यावतीने निवेदन देण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रा.अंबादास शिंदे, रावसाहेब म्हस्के, नंदकुमार डाळींबकर, महेश कुलकर्णी, रविंद्र हरिश्चंद्रे, राजू पवार, संतोष ढाकणे, चंद्रकांत वारुळे, विलास कोतकर, संतोष उरमुडे, नंदकुमार जाधव, ज्ञानेश्वर कोळगे, बापुसाहेब दुधाडे आदि उपस्थित होते.

     अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ज.मो.अभ्यंकर यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जुनी पेन्शन योजना सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना लागू करण्यात यावी. मेडिक्लेम योजना लागू करावी, पवित्र पोर्टल, बोगस भरतीत लक्ष घालावे, नगर जिल्ह्यातील पे युनिट मध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे, यामध्ये लक्ष घालावे. शिक्षकसेना पदाधिकार्‍यांना संरक्षण द्यावे. सर्व मंजूर पदांची भरती व्हावी. प्रत्येक शाळेत संगणक शिक्षकांचे पद निर्माण करावे. विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात यावे, बढती झालेल्या प्रस्तावांना शिक्षणाधिकारी यांची मान्यता मिळावी. तसेच कोविडने मयत झाले झालेल्या शिक्षक, कर्मचार्‍यांच्या पाल्यांना अनुकंप तत्वावर नोकरी देण्यात यावी आदि मागण्या करण्यात आल्या आहेत.

     याबाबत ना.अभ्यंकर यांनी निवेदनावर मंत्रीमंडळाच्या बैठकीत आपल्या मागण्या मांडून त्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन असे आश्वासन दिले.

 

     

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post