अहमदनगर-मुकुंदनगर सह उपनगरांना सुसज्ज वाचनालय ,स्पर्धा परिक्षा केंद्र व खेळांची क्रीडागण उपलबध करण्यात येतील.असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यानी केले.
राष्ट्रीय युवक दिननिमीत्त इक्रा वाचनालय व कर्मयोगी प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित युवक गौरव सोहळ्यांत ते बोलत होते .सध्याची युवा पिढी मोबाइल व सोशल मिडियामुळे वाचन व खेळा पासून दूर जात आहे.आजचा युवक उद्या चे देशाचे भविष्य आहे त्याचे सुप्त कला गुण ,छंद व क्षमताना विकसित करण्यासाठी वाचन व खेळा सह प्रवेश प्रक्रियेत ही लाखो विद्यार्थी सहभागी् होतात.या सर्व स्पर्धां मध्ये यशस्वी होण्यासाठी युवकांनी वाचन , स्पर्धा परिक्षा केंद्र या कडे वळले पाहिजे.इक्रा वाचनालया ने आज या युवकांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारून प्रोत्साहन दिले .इतरानींही याची प्रेरणा घ्यावी .असा हा स्तुत्य उपक्रमआहे.भविष्यात वाचनालय व खेळाची मैदाने सुसज्ज करण्यात येतील असा विश्वास आ .जगताप यांनी व्यक्त केला .
आय आय टी.च्या लाखो परिक्षाथी मध्ये पात्र ठरलेल्या शोयेब अबनसर शेख याने अपल्या शहराचे नाव उंचावले..12हजर 500 फुट उंचीचे उतरा खंड येथील शिखर सर केलेला अब् शाम फ़िरोज पठाण हा विद्यार्थी अहमदनगर चा आहे .तसेच महाराष्ट्र च्या व्हलिबोल संघाच्या उपकर्णधार पदी याहया इरफान पठाण यांची निवड झाली.या सर्वा चे शहराचे आ.संग्राम जगताप यांचे गौरव सत्कार करण्यात आला.तसेच वयाने जरी नसले तरी मनाने व कार्यने युवक असलेले माजी प्राचर्य अ.कादिर सर जीवन गौरव पुरस्कार ने सन्माननीत करण्यात आले आहे.तसेच रसिक ग्रुप चे जयंत येलुलकर यांची महाराष्ट्र राज्य मराठी साहित्य परिषद च्या सदस्य पदी निवड करण्यात आली.तसेच मिर बिल्डर्स चे इरफान जहागिर्दार यांना उद्योग रत्न पुरस्कार ने सन्माननीत करण्यात आले.या करिता यांचा आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमा चे प्रास्ताविक इक्रा चे अध्यक्ष पत्रकार सय्यद वहाब यानी केले .कार्यक्रमास नगरसेवक समद खान,आसीफ़ सुलतान,डॉ.रिजवान अहमद,ऐड़. हनीफ बाबुजी ,शफी जहगिरदार ,समीर खान.वसीम सय्यद,अल्ताफ शेख,अबनसर शेख ,डॉ.वहिद आंबेकर ,इरफान पठाण.हारुण शेख,अन्सार शेख,ज़ैद सय्यद,आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांनी आपले यथोचित विचार व्यक्त केले .सुत्रसंचालन सय्यद वहाब यानी तर डॉ.रिजवान अहमद यांनी आभार व्यक्त केले .
Post a Comment