अहमदनगर-(प्रतिनिधी) महानगरपालिका कोरोना दक्षता पथकांच्या वतीने रोजी बालिकाश्रम रोड येथील ज्ञानप्रबोधिनी लक्ष अकॅडमी येथे भेट दिली असता तेथे काही विद्यार्थी व शिक्षक हे विनामास्क आढळले त्यामुळे तेथे दंडात्मक कारवाई करून रु ५०० प्रमाणे १६ विद्यार्थी व शिक्षक यांना एकूण ८०००/- रु दंड करण्यात आले तसेच तेथे आणि बाकी क्लास चालकांना मास्क वापरण्याबाबत व सॅनिटायझर वापरण्याबाबत सोशल डिस्टंसीग बाबत सूचना दिल्या यावेळी नंदकुमार नेमाने ,राजेंद्र बोरुडे, राहुल साबळे, अमोल लहारे , भीमराज कांगुडे ,नंदकुमार रोहोकले ,गणेश वरूटे विष्णू देशमुख ,अमित मिसाळ ,दीपक सोनवणे ,गणेश धाडगे अनिल कोकणी उपस्थित होते.
तसेच माळीवाडा जुने मनपा ऑफिस परिसर ,माळीवाडा ते बस स्थानक परिसर येथे मास्क लावणे बाबत नागरिकांना सूचना देण्यात आली या ठिकाणी अनिल लोंढे ,तुळशीराम जगधने ,संदीप वैराळ ,आप्पासाहेब सुपेकर, उपस्थित होते
अशी माहिती दक्षता पथक सनियंत्रण अधिकारी शशिकांत नजान यांनी दिली.
शहरात व उपनगरात खाजगी आस्थापना,दुकानदार,व्यापारी व नागरिकांनी कोरोना नियमावलीचे पालन करावे नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश आयुक्त श्री.शंकर गोरे आणि उपायुक्त श्री.यशवंत डांगे यांनी दिले आहेत.
Post a Comment