दुकानांवरील पाट्या मराठीत करा. अन्यथा गाठ मनसेशी



अहमदनगर(प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील सर्व दुकानांवरील , आस्थापना तसेच हॉस्पीटल, मोबाईल कंपनीचे जाहिरात फलक पाट्या हे दुकानावरील वरील मोठ्या व ठळक मराठी भाषेत असाव्यात असे आदेश काढण्यात आलेले आहेत यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जवळपास पंधरा वर्षापासून प्रयत्न करीत आहेत अनेक वेळा आंदोलनही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेले आंदोलनाला त्त्याला कुठेतरी आज यश येताना दिसत आहे तरी देखील नगर शहरातील अनेक दुकाने, हॉटेल्स, हॉस्पिटल इतर सर्व आस्थापना तसेच जाहिरातदार मोबाईल कंपन्या व इतर कंपन्यांचे बोर्ड हे मराठीमध्ये नसून इंग्रजी भाषेत आहेत त्यामुळे या सर्वांनी आपल्या पाट्या मराठीत ठळक व मोठ्या अक्षरात कराव्यात असा इशारा मनसेच्या नितीन भुतारे यांनी दिलेला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ही आज विनंती आहे जर येणाऱ्या पंधरा दिवसात शहरातील मराठीत झाल्या नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गाठ आहे त्या सर्व पाट्या या मनसेच्या वतीने करण्यात येतील आपण महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्रात मराठी भाषेचा अभिमान असावा व आपण स्वाभिमानाने त्या पाट्या मराठीत कराव्यात व गर्वाने मराठी भाषेचा गौरव आपण करावा असे आवाहन देखील मनसेचे नितीन भुतारे यांनी नगर शहरातील दुकानदार व मोबाईल कंपन्या व इतर सर्व सभासदांना केले आहे.
महाराष्ट्रात जर मराठीसाठी आपल्याला भांडावे लागत आहे. त्यामुळे मराठी भाषेचा गौरव करावा मराठी भाषेचा प्रसार व्हावा याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वारंवार पावले उचललेली आहेत तरी आपणही एक मराठी नागरिक मराठी अभिमान म्हणून आपण सर्वांनी या राज्य सरकारच्या निर्णयाला पाठिंबा द्यावा व आपल्या दुकानांवरील हॉटेल्स वरील मोबाईल दुकानांवरील तसेच इतर सर्व आस्थापना हॉस्पिटल खाजगी क्लासेस शाळा या सर्वां वरील पाट्या मराठीत कराव्यात अशी विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही करत आहोत आपण याची दखल घेतली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक फेब्रुवारी नंतर पंधरा दिवसानंतर ज्या सर्व पाट्या मराठीत नसतील अशा सर्व पाट्या काळ्या करण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना करणार आहे जर भविष्यात संघर्ष होण्याची वेळ आली गाठ ही मनसेची राहील याची नोंद सर्वांनी या प्रसिद्धीपत्रकाद्वारे घ्यावी अशी मी विनंती करीत आहे. मराठीला विरोध करणाऱ्यांना आम्ही धडा शिकवू असा ईशारा देखील मनसेचे नितीन भुतारे यांनी दिला आहे. हे आंदोलन मनसेच्या वतीने एक फेब्रुवारी नंतर हाती घेण्यात येईल याची सर्व दुकाने, हॉटेल, मोबाईल कंपनी, शाळा, खाजगी क्लासेस, हॉस्पीटल तसेच ईतर सर्व आस्थापना यांनी याची नोंद घ्यावी.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post